Dictionaries | References

आवरणें

   
Script: Devanagari
See also:  आटोपणें

आवरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To protect, support, sustain, cover, gen. Ex. मज बुडतां आवरी ॥ देवा प्रपंच- सागरीं ॥
āvaraṇēṃ n The gorging of women on the night of भाद्रपदशुद्धद्वितीया.

आवरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Gather together. Manage; rule. Protect. Enwrap; wind up. The gorging of women on the night of भाद्रपद शुद्ध द्वितीया.

आवरणें     

 न. आवरण ६ पहा . हरितालिकापूजेच्या आदल्या रात्रीं ( भाद्र . शु . २ ) करावयाचा फराळ .
उ.क्रि.  
उ.क्रि.  आवरणें व आटोपणें संयु . क्रि .
 न. ( सोनारी काम ) भांड्यास पसरट आकार देण्यासाठीं उपयोगांत आणावयाची हातोडी . [ सं . आ + वृ ]
एकत्र करणें ; गुंडाळणें ; आटोपणें ; थोडक्या जागेंत आणणें ; गोळा करणें ; संपविणें ( वस्तु , कामें इतर गोष्टी इ० ). आटपतें घेणें . जी ताईसाब ! पण आपुन जरा आवरतं घ्या . - चंद्रग्रहण ४१ .
आवरणें पहा . ( जोडक्रियापदामुळें अर्थवृध्दि होते )
( ल . ) माघारें घेणें ; परत घेणें . प्रसाद करणें मनीं जरि नसेल हें आवरा । - केका १४ .
वहिवाटणें ; व्यवस्था पाहणें ; देखरेख करणें ; अम्मलबजावणी करणें .
झांकणें ; वेढणें ; आच्छादणें ; गुंडाळणें ; व्यापणें ; व्यापून असणें . म्हणोनि आम्ही तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरुनि असे ॥ ज्ञा १३ . ८८२ . तूं सर्वात्मा असतां ह्रदयीं । चित्त प्रवेशेना तुझ्या ठायीं । तें आवरिलें असें विषयीं । नवल कायी सांगावे - एभा ७ . १६८ .
ताबा चालविणें ; नियमन करणें ; अटकाव करणें ; हुकमतींत ठेवणें . तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । - ज्ञा १ . १२३ . तैसा आत्मा आवरला । प्रपंचे हा । - विपू ७ . ११३ .
आपल्याकडें घेणें ; सांभाळ करणें ; वाढविणें ( अनाथ पोरक्या मुलांचा वगैरे ).
( काव्य ) रक्षण करणें , मदत करणें , आश्रय देणें ; आच्छादन घालणें . मज बुडतां आवरी । देवा प्रपंच सागरीं ॥ [ सं . आ + वृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP