|
न. झांकण अर्थ १ पहा . जैसें झांकणें चर्मकुंडाचें । उघडितांच नये । - दा ३ . १ . १४ . उ.क्रि. १ आच्छादणें ; झांकण घालणें . त्यामाजीं बाणांच्या संधानें । झांकिन्नली यादवसैन्यें । - मुवन ३ . ७० . २ लपविणें ; छपविणें . ३ ( ल . ) ( एखादी गोष्ट , व्यवहार ) छपविणें ; दाबून , लपवून ठेवणें ; दाबादाबी करणें . ४ ( उपकार इ० ) न फेडतां तसेच ठेवणें , राखणें . तुझा ऐसा उपकार मी न झांकीं । - र १३ . [ सं . झष =( आच्छादणें )- झाँख - झाँक - भाअ १८३४ . प्रा . झंप = झांकणें . सं . शाख = पूर्णपणें व्यापणें किंवा सं . छादन ] म्ह० न्हातीचे बाल व खातीचे गाल झांकत नाहींत . ( वाप्र . ) झाकउघड - स्त्री . झांकणें आणि उघडणें . उघडझांक पहा . झांकली मूठ - स्त्री . ( एखाद्याची अप्रकट ) स्वाभाविक स्थिति ; परिस्थिति ; स्वरूप . म्ह० झांकली मूठ सव्वा लाखाची = आपण होऊन आपली ( ज्ञान , संपत्ति इ० कांची ) स्थिति उघडी करून दाखवूं नये . त्यांत आपली अब्रू राहते . झाकलें माणीक - न . ( ल . ) दिसायला साधा पण खरोखर गुणी व विद्वान मनुष्य . झांकल्या पाठीचा - वि . ज्याला कांहीं सबब सांगता येईल किंवा जो फारसा अक्षम्य समजला जाणार नाहीं असा ( अपराध इ० ). झांकल्या पाठीनें - क्रिवि . अब्रू गमावून न घेतां ; प्रतिष्ठितपणानें ; बोज कायम ठेवून . झाकल्या मुठीं , झाकल्या मुठीनें - क्रिवि . गुपचूप ; बभ्रा न करितां ; बोभाटा न होऊं देतां ; कोणालाहि कळूं न देतां ; गुप्तपणें . झांकसापा करणें - सक्रि . ( व . ) दाबादाबी करणें . झांकून - क्रिवि . संक्षेपानें . - शर . झांकापाक , झाकापाक , झांकापाकी , झाकापाकी - स्त्री . १ जेवण झाल्यानंतरचीं स्वयंपाकघरांतील उरलींसुरलीं कामें ( समुच्चयानें ). स्वयंपाक घरांतील झाकापाक करून त्याही वर गेंल्या . - कोरकि ३०३ . २ जलदीनें , गडबडीनें आवरणें , उरकणें . [ झांकणें द्वि . ] झांकीव - वि . १ झांकण , ढांपण असलेला ( डबा , पेटी इ० ). २ ज्यावर झांकण , आच्छादन ठेवलेलें आहे असा . ३ झांकून ठेवलेला ; लपवून ठेवलेला ; बंद करून ठेवलेला . [ झांकणें ] झांक्या - वि . झाकणारा . [ झांकणें ]
|