|
स्त्री. ( खा . ) तुळई . - भात्रै ७ . १ . ४ . पुस्त्री . १ लता ; वृक्षदिकांवर चढणारी वनस्पति . २ नागवेल . ३ कुडूक , काप इ० कानांतल्या दागिन्यांस सोन्यामोत्यांची सांखळी असते ती . ४ वंश ; वंशज . पार्थ म्हणें रक्ष या स्वयें वेला । - मोअश्व ४ . ४० . ५ वेलाच्या आकाराची नक्षी . ६ सोललेल्या झाडांचें पातळ वेष्टन , साल ( भारा इ० बांधण्याच्या उपयोगी ). [ सं . वल्लि ; प्रा . वेल्ली ; गु . पं . वेल ] स्त्री. घोडयांना होणारा क्षयासारखा एक रोग . ०चढविणें उतरविणें वेलाला आढया देणें - ( पानमळा ) वेल वर गुंडाळणें , खालीं करणें इ० क्रिया . परतविणें - वेल उलटविणें ( रताळी इ० चा ). ०मांडवास , वाढणें - वंश वाढणें ; कुटुंबाविस्तार होणें . प्रिय पुत्रातें भेटोनि रडुनि म्हणे मांडवास जा वेला । - मोआश्रम ४ . २ . जाणें , वाढणें - वंश वाढणें ; कुटुंबाविस्तार होणें . प्रिय पुत्रातें भेटोनि रडुनि म्हणे मांडवास जा वेला । - मोआश्रम ४ . २ . ०गुंडी स्त्री. ( व . ) गवताच्या घरावर टाकण्याकरितां तुर्हाटयाचे वेट दूरदूर लावून केलेला कडा . ०गोंड पु. एक भाजी . ०चवळी स्त्री. एक प्रकारची चवळी . ०पत्ती स्त्री. वेल , पानें यांची नक्षी ; बूट . ०बाळी स्त्री. एक बुगडयाप्रमाणें कानांतला दागिना . कानीं धेंडया आणिक वेलबाळया मोत्याचे सर । - अफला ५५ . ०बुटी बुट्टी बूट बुट्टा - स्त्रीपु . भिंत , कागद , छीट इ० वर काढलेली वेलाची नक्षी , तर्हेतर्हेची बूट . ०बोंडी स्त्री . एक भाजीचा वेल . फळाला वेलबोंडें म्हणतात . ०मिरची स्त्री. एका जातीची मिरची . ०वटी स्त्री. कुंपण . तेणें वाचेस पडली वेलवटी । बोलों उफराटी विसरली । - एभा ९ . ४२४ . ०वाक पु. ( ना . ) वेली वगैरे समुच्चयानें . ०वांगी स्त्री. वांग्याची एक जात . फळाला वेलवांगे म्हणतात . ०विस्तार पु. द्राक्ष किंवा इतर वेलीचा मोठा विस्तार , फैलाव . ०विस्तार ( ल . ) वंश , कुटुंब वाढणें ( आशीर्वादांत योजतात ) वेलरी - स्त्री . वेल ; वल्लरी ; वेलीचे जाळे . मग पै कामनाचि तया । जिवों जाल्या वेलरिया । - ज्ञा १६ . ३६७ [ सं . वल्लरी ] वेली - स्त्री . १ वेल पहा . २ लांब गाणें . एकु हामामा घालिति हुंबळी । एकु वेली गातांती । - दाव ८५ ३ वंश . आमुची वेली कां खुटिली । हा हा देवा वॄत्ति बुडाली । - दा ३ . ३ . ४० . वेली जाणें - विस्तारणें ; वाढणें . जैसा वर्षाकाळु गगनी । पाल्हे जे नवघनी । तैसें आकारजात अज्ञानीं । वेली जाय । - ज्ञा १५ १५२ ; - एभा २६ . २५० . वेल्या करंज - पु . करंज झाडाची एक जात . वाढणें ( ल . ) वंश , कुटुंब वाढणें ( आशीर्वादांत योजतात ) वेलरी - स्त्री . वेल ; वल्लरी ; वेलीचे जाळे . मग पै कामनाचि तया । जिवों जाल्या वेलरिया । - ज्ञा १६ . ३६७ [ सं . वल्लरी ] वेली - स्त्री . १ वेल पहा . २ लांब गाणें . एकु हामामा घालिति हुंबळी । एकु वेली गातांती । - दाव ८५ ३ वंश . आमुची वेली कां खुटिली । हा हा देवा वॄत्ति बुडाली । - दा ३ . ३ . ४० . वेली जाणें - विस्तारणें ; वाढणें . जैसा वर्षाकाळु गगनी । पाल्हे जे नवघनी । तैसें आकारजात अज्ञानीं । वेली जाय । - ज्ञा १५ १५२ ; - एभा २६ . २५० . वेल्या करंज - पु . करंज झाडाची एक जात .
|