Dictionaries | References म माजर Script: Devanagari See also: मांजर Meaning Related Words माजर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वाग, बिबटो, बी कुळांतलो घरांत पोसतात असो एक ल्हान प्राणी Ex. माजरान हुंदराक धरलो HYPONYMY:बुकलो माजर ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমেকুৰী bdमाउजि benবেড়াল gujબિલાડી hinबिल्ली kanಬೆಕ್ಕು kasبیٛٲر malപൂച്ച marमांजर mniꯍꯧꯗꯣꯡ nepबिरालो oriବିଲେଇ panਬਿੱਲੀ sanमार्जारः tamபூனை telపిల్లి urdبلی , گربہ noun मादी माजर Ex. माजर आपल्या पिलांक दूद पिवयता ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবিড়াল gujબિલાડી kasبِیٲر oriବିଲେଇ sanमार्जारी urdبلّی , بلائی , بلیّا , بلاری माजर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A cat. 2 n The core of a carrot. माझ्या घरांत मा0 व्याली काय? Said to one who has ceased to visit. माजर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 c मांजरूंn A cat. माजर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक लहान ग्राम्य जनावर ; बिल्ली याचा रंग पांढरा , काळा , पिवळा , उदी , मुगी इ० , केंस मऊ व तुळतुळीत , डोळे घारे व शेपूट लांब असतें . हें उंदीर मारुन खातें ह्यास अंधारांत फार चांगलें दिसतें . रानमांजराची जात फार क्रूर असते .गाजराचा गाभा , सुळा . [ सं . मार्जार ; प्रा . मंजार ] म्ह०मांजराचे गळ्यांत घाट कोणी बांधावी ? =( स्वसंरंक्षणार्थ युक्ति म्हणून सर्व उंदरांनीं , मांजराच्या गळ्यांत घांट बांधल्यानें तिचा आवाज होऊन मांजर आलेलें कळेल , असें ठरविलें पण घांट बांधण्यास कोणी पुढें होऊना यावरुन ) दिसण्यांत सोपी पण करण्यास अशक्य अशी गोष्ट .( व . ) मांजरीचें दांत तिच्या पिलास खात नाहींत = आपलें मनुष्य कितीहि बोललें तरी राग येत नाहीं .मांजर गेलें लुटी आणि आणल्या चार मुठी .०आडवें - ( ल . ) एखाद्या कामास अडथळा येतो अशी समजूत आहे यावरुन . )येणें - ( ल . ) एखाद्या कामास अडथळा येतो अशी समजूत आहे यावरुन . )०मारणें पाप करणें ; ( मार्जारवध हें एक पातक आहे यावरुन ल . ) अपराध , गुन्हा करणें . माझ्या घरांत मांजर व्याली काय ?- ज्यानें भेटीस यावयाचें सोडलें आहे त्यास म्हणतात . मांजराची मावशी स्त्री . चिचुंद्री ( कारण मांजर ह्या प्राण्यास मारीत नाहीं ). मांजराचे पाय पुअव . ( ल . ) गिचमिड , चिडबिड अक्षर . कुत्र्याचे पाय या शब्दाशीं सामान्यतः जोडून उपयोग . मांजराचे पाय कुत्र्यावर करण एखाद्या गोष्टींत , कामांत कांहीं तरी लटपट , गडबड करणें . सामाशब्द -०झांक प - संधिप्रकाश व रात्र यांच्या दरम्यानची वेळ ( यावेळीं मांजरें दृष्टीस पडत नाहींत यावरुन ).०डोळ्या वि. मांजराच्या डोळ्याप्रमाणें डोळे असलेला ; घारडोळ्या .०मुतवणी न. कोमट पाणी , द्रव .०वेल स्त्री. तांदुळाची एक जात . मांजरी स्त्री .खाकेंत होणारी गांठ . ( या गाठीवर उपाय म्हणून तीवर लोणी लावून तें मांजराकडून चाटवितात . यावरुन ); खाकमांजरी पहा .घुसळखांबाच्या रवीच्या फासाच्या दोर्या प्रत्येकी ; मांजरें ; मांदिरें .मांजरांना फार प्रिय असलेली एक वनस्पति .( कों . ) किसणी ; विळी .( कों . ) मांजराची स्त्री . भाटी .( गो . ) चटई ( लव्हाळ्याची ).०कवळप ( कों . ) अंथरुण गुंडाळणें . मांजरुं न . मांजर ( कोणत्याही लिंगीं - लडिवाळपणानें , तिरस्कारानें ). मांजरें न . घुसळखांबाची दोरी . मांजर्या स्त्रीअव . उंदर्यामांजर्या पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP