Dictionaries | References म मांजर Script: Devanagari See also: माजर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मांजर A dictionary, Marathi and English | Marathi English | | A cat. 2 n The core of a carrot. माझ्या घरांत मा0 व्याली काय? said to one who has ceased to visit. Rate this meaning Thank you! 👍 मांजर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | c मांजरूं n A cat. Rate this meaning Thank you! 👍 मांजर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun वाघाच्या कुळातील एक लहान पाळीव प्राणी Ex. मांजर उंदीर मारून खाते. HYPONYMY:बोका ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমেকুৰী bdमाउजि benবেড়াল gujબિલાડી hinबिल्ली kanಬೆಕ್ಕು kasبیٛٲر kokमाजर malപൂച്ച mniꯍꯧꯗꯣꯡ nepबिरालो oriବିଲେଇ panਬਿੱਲੀ sanमार्जारः tamபூனை telపిల్లి urdبلی , گربہ Rate this meaning Thank you! 👍 मांजर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. एक लहान ग्राम्य जनावर ; बिल्ली याचा रंग पांढरा , काळा , पिवळा , उदी , मुगी इ० , केंस मऊ व तुळतुळीत , डोळे घारे व शेपूट लांब असतें . हें उंदीर मारुन खातें ह्यास अंधारांत फार चांगलें दिसतें . रानमांजराची जात फार क्रूर असते . गाजराचा गाभा , सुळा . [ सं . मार्जार ; प्रा . मंजार ] म्ह० मांजराचे गळ्यांत घाट कोणी बांधावी ? =( स्वसंरंक्षणार्थ युक्ति म्हणून सर्व उंदरांनीं , मांजराच्या गळ्यांत घांट बांधल्यानें तिचा आवाज होऊन मांजर आलेलें कळेल , असें ठरविलें पण घांट बांधण्यास कोणी पुढें होऊना यावरुन ) दिसण्यांत सोपी पण करण्यास अशक्य अशी गोष्ट . ( व . ) मांजरीचें दांत तिच्या पिलास खात नाहींत = आपलें मनुष्य कितीहि बोललें तरी राग येत नाहीं . मांजर गेलें लुटी आणि आणल्या चार मुठी .०आडवें - ( ल . ) एखाद्या कामास अडथळा येतो अशी समजूत आहे यावरुन . )येणें - ( ल . ) एखाद्या कामास अडथळा येतो अशी समजूत आहे यावरुन . )०मारणें पाप करणें ; ( मार्जारवध हें एक पातक आहे यावरुन ल . ) अपराध , गुन्हा करणें . माझ्या घरांत मांजर व्याली काय ?- ज्यानें भेटीस यावयाचें सोडलें आहे त्यास म्हणतात . मांजराची मावशी स्त्री . चिचुंद्री ( कारण मांजर ह्या प्राण्यास मारीत नाहीं ). मांजराचे पाय पुअव . ( ल . ) गिचमिड , चिडबिड अक्षर . कुत्र्याचे पाय या शब्दाशीं सामान्यतः जोडून उपयोग . मांजराचे पाय कुत्र्यावर करण एखाद्या गोष्टींत , कामांत कांहीं तरी लटपट , गडबड करणें . सामाशब्द -०झांक प - संधिप्रकाश व रात्र यांच्या दरम्यानची वेळ ( यावेळीं मांजरें दृष्टीस पडत नाहींत यावरुन ).०डोळ्या वि. मांजराच्या डोळ्याप्रमाणें डोळे असलेला ; घारडोळ्या .०मुतवणी न. कोमट पाणी , द्रव .०वेल स्त्री. तांदुळाची एक जात . मांजरी स्त्री . खाकेंत होणारी गांठ . ( या गाठीवर उपाय म्हणून तीवर लोणी लावून तें मांजराकडून चाटवितात . यावरुन ); खाकमांजरी पहा . घुसळखांबाच्या रवीच्या फासाच्या दोर्या प्रत्येकी ; मांजरें ; मांदिरें . मांजरांना फार प्रिय असलेली एक वनस्पति . ( कों . ) किसणी ; विळी . ( कों . ) मांजराची स्त्री . भाटी . ( गो . ) चटई ( लव्हाळ्याची ).०कवळप ( कों . ) अंथरुण गुंडाळणें . मांजरुं न . मांजर ( कोणत्याही लिंगीं - लडिवाळपणानें , तिरस्कारानें ). मांजरें न . घुसळखांबाची दोरी . मांजर्या स्त्रीअव . उंदर्यामांजर्या पहा . Related Words मांजर खवलें मांजर मांजर मारणें ताटाखालचें मांजर हुंद्राक मांजर गवाय मांजर गू लिपैता मांजर आडवें येणें सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे मांजर नाथिल्या गांवांत हुंदीर राया मांजर नाथिल्ले घर उंद्रा राज्य माझ्या घरांत मांजर व्याली काय? निदिल्लें मांजर उंद्राक धरिले वे? बिल्ली माजर मांजर बावडॅं दॉळॅ धांपून दूध पिता वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट उडाऊ आणि व्याजखोर, उंदरास जसे मांजर मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें काशीस गेल्याचें आपण सांगतो पण मांजर मारल्याचें सांगत नाहीं खवळ्या मांजर काळें मांजर उंदीर मांजर जंगली मांजर ताटाखालचे मांजर मांजर मुतवणी उंदराला मांजर साक्ष उंदरास मांजर साक्ष मांजर मारुन काशीस जाणें बिरालो माउजि मार्जारः بیٛٲر பூனை বেড়াল মেকুৰী പൂച്ച मालक गैदी आणि मांजर कैदी पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं ବିଲେଇ काशीस गेल्याचें सांगतो, मांजर मारल्याचें सांगत नाहीं असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद मांजर अगदीं डोळे झांकून दूध पितें मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला मांजर गेलें लुटी आणि आणल्या चार मुठी పిల్లి ਬਿੱਲੀ બિલાડી ಬೆಕ್ಕು अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें काय म्हणते तर्हा, कोंबडी म्हणते बिलवर भरा, मांजर म्हणते हजामत करा ! true cat wildcat cat catstep cat's whisker विठया शिंकाळयाचें सुटलें, मांजराला फावलें ढोलाचा साक्षीदार दंडा मांजराची मावशी मुये शेरसे जिती बिल्ली भली मंगू इजट उंदरांमांजरां प्रमाणें विडाक बाबा गातो नि सोमा ऐकतो बिडाळक खुदाके वास्ते बिल्लीभी चुन्हां नहि मारते उंदरांची दाटी, तितक्यांत आली भाटी उंदराला माऊ, बायकोला जाऊ घुरणें विठूबोका otter गुरगुरणे गुरगुरावणी बिडाळ बिलू लुबकणें मांजरझाक मार्जर मनुरी नख्या बाहेर काढणें अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार डरसा बारक्या फणसाला म्हैस राखण लुबकणे मांऊं मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते फुसफुसणे civet आडखुळा गंधमार्जार उपसळो कुत्र्याचा पाय मांजरावर आणि मांजराचा पाय कुत्र्यावर कुत्र्याचे पाय मांजरावर व मांजराचे पाय उंदरावर घुरम्यांव वाघाची मावशी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP