Dictionaries | References

गाशा

   
Script: Devanagari

गाशा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A small sitting cloth; made usually of cotton cloth overlaid with broad cloth. used esp. as housings or ornamental covering over the saddle. गाशा गुंडाळणें To gather up and depart; viz. to run away; or to die.

गाशा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A small sitting cloth used esp. as housings or ornamental covering over the saddle.
गाशा गुंडाळणें   gather up and depart; viz. run away; or die.

गाशा

  पु. खोगिराचें आच्छादन किंवा बिछायत ; वरील अंगास सकलातीचे किंवा बनातीचे निरनिराळया रंगाचे तुकडे व आंतील अंगास खारवें असें शिवून केलेलें दुहेरी वस्त्र ; पातळ गादी . [ अर . घाशिआ ] ( वाप्र . )
०गुंडाळणें   १ जाण्यासाठीं आवराआवर करणें ; आपलें सामानसुमान गुंडाळून चालतें होणें . पुण्यांतले लोक चांगले व्यवहारज्ञ आहेत , ते आपल्या हातीं लागणार नाहींत अशी खात्री होतांच स्वामींनीं तेथून आपला गाशा गुंडाळला . - नि . २ पळून जाणे ; ३ मरणें .
०टाकणें   अंथरूण पसरणें ( स्वार खोगिरावरचा गाशा निजावयास घेतात त्यावरून ). इकडे स्वारांनींहि आपापल्या भाकरी खाऊन ते आतां गाशा टाकून विश्रांति घेत उघडया पटांगणांत पडले होते . - स्वप ९५ .

गाशा

   गाशा गुंडाळणें
   [गाशा=खोगीरावर टाकण्याचे सकलाती वस्‍त्र.] १. कूच करण्याचा हुकूम झाल्‍यावर सैनिक विश्रांतीसाठी हांथरलेला गाशा गुंडाळतो व घोड्यावर घालून चालू लागतो. त्‍यावरून, जाण्यासाठी आवराअआवर करणें. २. पळून जाणें
   धूम ठोकणें
   पळ काढणें
   निसटून जाणें. ‘पुण्यातले लोक चांगले व्यवहारज्ञ आहेत, ते आपल्‍या नादी लागणार नाहीत, अशी खात्री होतांच, स्‍वामींनी तेथून आपला गाशा गुंडाळला.’ -नि.
   मरणें
   हे जग सोडून जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP