|
स्त्री. घडमोड पहा . स्त्री. १ ( भांडीं , मडकीं , दागिने इ० ) घडण्याची आणि मोडण्याची क्रिया ; बनविणें व नष्ट करणें ; २ ( ल . ) देण्याघेण्याचा , खरेदी - विक्रीचा , उसने घेण्या - देण्याचा व्यवहार ; खटाटोप ; उचापत ; धंदा ; व्यवहार ; व्यापार . ३ फेरफार ; उलथापालथ ; ( सरकारी नोकर ) ठेवणें काढणें ; बदलणें ; जुन्याच्या जागीं नवीन आणणें इ० किंवा नवे - जुनें करणें . ४ रचना ; घाट ; बनावट ; घडण ( यंत्रावयवाची , भागाची इ० ). ५ ( धंद्यांतील , व्यापारांतील ) भानगडी ; गुंतागुंत ; गाशा गुंडाळणें दिवाळें इ० . ६ ( एखाद्या श्लोकाची , कवितेची , उतार्याची ) गुंतागुंत ; घोंटाळा ; क्लिष्टता ; लपेटी ( कवीच्या काव्यरचनेंतील ) गुंतागुंत ; क्लिष्टता ; नाना तर्हेच्या युक्त्या . ७ ( नाटकांतील - नाटकाच्या संविधानकांतील ) कूट ; डावपेंच ; खुबी ; गुंतागुंत . ८ ( सामा . ) कुशलता ; चातुर्य ; खुबी ; हातोटी ; कला ( एकत्र मांडणें , विवरण करणें ; वागविणें इ० ची ) [ घडणें + मोडणें ] ईश्वराची घडामोड , ब्रह्मदेवाची घडामोड - स्त्री . चढविणें व खालीं पाडणें हा परमेश्वराचा व्यापार - खेळ . संसारांतील चढउतार ; अवस्थांतरें . घडमोडणें - अक्रि . ( काव्य . ) घडलें , बनवलें आणि मोडलें जाणें ; उत्पन्न आणि नष्ट होणें . तुमच्या इच्छामात्रें निश्चितीं । अनंत सृष्टि घडमोडती । [ घडमोड ]
|