Dictionaries | References

सळ

   
Script: Devanagari
See also:  सल , सलक , सलख

सळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Teasing, tormenting, irritating or vexing acts. Ex. पुढें वसिष्ठाचेनिं सळें काय केलें परियेसा.

सळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The cord or other fastener of the scabbard of a sword with the hilt. Teasing.

सळ     

 पु. १ अभिमान ; आग्रह ; हट्ट ; ईर्षा . म्हणौनि कामचेनि बळें । जो विषय सेऊं पाहे सळें । - ज्ञा १६ . ४५४ . अहंकारें सांडिलें सळ । वियोगु देखौनिया । - ऋ १०१ . बळियाचीं आम्ही बाळें । असों निर्भर या सळें । - तुगा १८१८ . २ बळ ; झपाटा ; उसळी ; ऊर्मी ; आवेश . तैसा नुठी जया सळू । कामोर्मीचा । - ज्ञा १५ . ३०२ . हाणित थाप मुखांत सळानें । - आ नवरस चरित्र ११७ . [ स . शल्य ]
पुस्त्री . घडीची दुमड , मोड , रेषा . [ सं . शलाका ]
 न. बाणाग्र ; टोंचणी ; लोखंड लांकूड वगैरेचा अणीदार बोंचणारा तुकडा . हृदयीं तप्तलोहाचें सळ । साहों येईल चिरकाळ । परी दुष्ट शब्दाची जळजळ । मरणान्तींहि शमेना । - मुआदि १८ . ४१ . [ सं . शल्य ]
 पु. भंग ; मोड ; न्यूनता . योगनिद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळु न पडे । - ज्ञा ५ . ७८ .
 न. १ छळ ; संकट ; पीडा ; गांजणूक . समुद्रलंघनाचें सळ । तुजवरी केवळ नये घालूं । - भा रा किष्किंधा १७ . ४० . २ घडामोड ; कटकट ; सुखदुःख . गेलें तारुण्य गेलें बळ । गेलें संसारीचें सळ । - दा ३ . ५ . ४५ . [ सं . छल ] सळणें - अक्रि . १ छळणें ; गांजणें ; त्रास देणें . जे बुध्दीतें सळी । निश्चयातें टाळी । - ज्ञा ६ . ४१४ . उपाधीच्या योगें सळिसी तूं आम्हां । - मध्व ७२ . २ भिणें ; भयभीत होणें . जयाचेनि नांवें सळे । महाभय । - ज्ञा १६ . ४१८ . ईस देखोनि सळसी । - आपुतना वध . ३७ . ८ . त्यास देखतांचि सळिजे । का उठोन तात्काळ पळिजे । - ह ६ . १९ . सळणूक - स्त्री . छळणूक .
 न. २ पीक कापल्यावर उरणारा धस ; सड ; कापलेला बुडखा किंवा त्यास फुटलेला अंकुर . [ सं . शल्य ]
 पु. १ तरवारीची मूठ म्यानास बांधावयाची दोरी , बंद . स्वार भाले वारूवर सळ सोडिले फिरंगीचे । - ऐपो ५७ . २ ( सामान्य ) बारीक वादी ( कातडें शिवण्याची ). [ सं . शलाका ]
 न. द्वेष ; वैर ; दावा ; वांकडेपणा . पतंगु जैसा सळें । दीपाचेनि । - ज्ञा १८ . ६१८ . [ सं . शल्य ]
 स्त्री. ( सोनारी ) सोन्याची लगड . [ सं . शलाका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP