|
स्त्री. पक्का हट्ट ; आग्रह छंद ; नाद ; हट्टीपणाची लहर . ( क्रि० घेणे ). ' आणीलां ही रुपा बळें । करूनि खळें हरिदासीं । ' - तुगा २२०१ . त्या पोरानें खाऊसाठी खळ घेतली .' क्रि.वि. खळखळ , घळघळ , झुळझुळ , छणछण , झणझण , खणखण अशा आवाजानें ( बांगड्या , किल्ल्या इ० चा शब्द ). ( ध्व . खळ ) स्त्री. १ बटाटयाचें सत्व , गहूं , तांदुळ , उडीद , क साबुदाण्याचें पीठ इ० पासुन डकवण्यासाठीं , वख्रास ताठपणा यावा म्हणुन किंवा कागद चिकटविण्यासाठे तयार केलेली पेज , चिकी , राप कोळ , गोद . २ ( कोष्ठी ) कपडा विणण्यापुरेवी सुतास बळकटी येण्यासाठी तांदुळ , ज्वारी , मकाकिंवा बाजरी यांचें पीठ शिजवून त्यांची लापशी करुन ती सुतास कुंचल्यानें लावतात अथवा जींत सुत बुडवून काढतात ती . ३ घारगे करण्यासाठी गुळवण्यांत शिजविलेले पीठ . ४ ( गो .) अम्लयुक्त खारट पाणी ; खार ( लोणच्याचा ). ( सं . खल् - एकत्र करणें ?) म्ह० परटाची खळ , ब्राह्मणाची सळ ( बायको ) लागलींच आहे . ०गट - न . १ पातळ व भिकार कालवण ( पीठ , भाजीपाला , चिंच इ० मिसळलेले ), ( निंदाव्यंजक ). २ ( ल .) कोणतेंहि अतिशय पातळ व आंबट , खारट कालवण ; आंबटी ; सांबारे . वि. दुर्जन ; नष्ट ; वाईट ; नीच ; दुष्ट ; खल पहा .' साधु निंदक परम खळ । आम्हांस करिसी तु विटाळ ॥ ' जड होती खळ दुष्ट लोक । ' - तुगा १५ . ( सं . खल ) पु. १ तहकुबी ; खंड , ( कामाचा , गमतीचा ). ( क्रि० पडणें ). ' लेखणी चालुं दे , खळ पाडुं नको .' २ उशीर ; खांटी . ( सं . स्थल् ) न. खळें पहा . १ शेतांतील धान्य मळणीची जागा , माळें . २ ( कों .) आंगण उघडी जागा . सामाशब्द - ० उडगल - कर्ना ) खळें झाडणें . ०पुंजी स्त्री. खळ्यावरचें धान्य मापतांना प्रत्येक मोठ्या रांशींतुन घेतलेले लहान ढीग ; मराठा अमदानीत ही सरकारी दस्तुरी समजली जाई . ०यज्ञ खलयज्ञ पहा . ०वट न. शेतमाल तयार होऊन खळ्यावर धान्याच्या राशी पडु लागतात तो हंगाम , काल . = गांगा ९९ . ०वटणी स्त्री. मळणीकरितां धान्याच्या पेंढ्या एकत्र जमा करणें . ०वळ न. रास काडुन नेल्यानंतर खळ्यावर इकडे तिकडे पडलेलें धान्य . हा गांवच्या माहाराचा हक्क आहे . ०वाडी - स्त्री . अनेक शेतकर्यांची खळीं असलेली गांवाच्या बाहेरची कुंपण घातलेली जागा ; खळ्याचा समुदाय . ' खळवाडेकडे गेला निघोनि । ' - दावि २४ . ( खळ + बाडी )
|