मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
श्रीचरण

श्री स्वामी समर्थ - श्रीचरण

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


ब्रम्हानंदे नाचू गाऊ श्री चरणाते पाहू
अनन्यभावे स्वामि समर्था सुमनांजलि वाहू

जीवाशिवाची भेट जाहली हरली भवचिंता
घेई पदरी दीन दयाळा स्वामी अवधूता

तू तर माझी वत्सल माता दूर नको राहू
नसे आसरा तुझ्याविना मज पसरी तव बाहू

जगताचा तू असशी स्वामी, समर्थ श्री दत्ता
शब्दरूप मम भावसमर्पण मानुन घे आता

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP