मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
आज मी

श्री स्वामी समर्थ - आज मी

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


प्रज्ञानगरी समर्थरुपे दत्तात्रय पाहिले
आज मी दत्तात्रय पाहिले

ब्रम्हा, विष्णू, महेश तिन्ही
एकरूप जाहले लोचनी
अनसूयेचे बाळ सुकोमल अवनीवर प्रगटले
आज मी दत्तात्रय पाहिले

शांत निरामय ध्यान हरीचे
हास्य मुखावर शशिबिंबाचे
जनार्दनातच अवघे स्थिरचर एकरूप जाहले
आज मी दत्तात्रय पाहिले

विश्वरूप हा ब्रम्ह सनातन
मुनिजन करिती अखंड चिंतन
आशीर्वच हा ईश कृपेचा, कृतार्थ जीवन झाले
आज मी दत्तात्रय पाहिले

सकलांचा हा एकच त्राता
आत्मवंचन सरली आता
आपपराचा दंभ न उरला, अंतर शुद्ध जहाले
आज मी दत्तात्रय पाहिले

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP