श्री स्वामी समर्थ - तव पदी विसावा
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
पैलतिरी दिसती स्वामी
ऐलतिरी नाव
मधे भोवर्याचा गुंता
भ्रांतचित्त जीव
संभ्रमात मन हे आता
डोह खोल पाणी
जाळतात सार्या चिंता
खंत जीवघेणी
क्षीतिज जळे आभासाचे
दूर तो किनारा
दिशाहीन झाला अवघा
शिडातील वारा
नको मला मुक्ती चारी
नको नाव गाव
घडो तुझी सेवा अविरित
हाच एक भाव
ऐलतिरी यावे स्वामी
कृपालोभ व्हावा
मागणेच अंती, लाभो
तव पदी विसावा
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
TOP