श्री स्वामी समर्थ - दर्शन
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
दिसलास मला तू
स्थितीत आणि गतीत
हे स्वामी समर्था
त्रिगुणात्मक रूपात
भीजलास चिंब तू
भक्तीच्या गंगेत
प्रगटलास अवघा
या पावनभूमीत
कधि चिंतनात तू
एकरूपसा होशी
रंगात ऋतूंच्या
रूप तुझे अविनाशी
दिसलास मला तू
बालकांच्या हास्यात
तव दर्शन घडले
पतितांच्या नयनांत
भक्तीचे गाणे गात
पक्षिगण रमले
वटवृक्षाखाली
सगुण रूप तव दिसले
मी तुला पाहिले
साठविले हृदयात
पाठीवर फिरता
तुझाच वत्सल हात
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
TOP