मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
ऊठि रे अवधुता

श्री स्वामी समर्थ - ऊठि रे अवधुता

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


ऊठि रे अवधुता
विश्वपालका स्वामी समर्था
दिंनांच्या नाथा ......... ऊठि रे अवधुता!

उष:काल जाहला गातसे कोकिळ वृक्षावरी
मंद वाहतो वायु सुगंधित मोद भरे अंबरी
अधिर जाहला अरुण नाभीचा
दर्शन दे आता ......... ऊठि रे अवधुता!

श्रीपाद श्रीवल्लभ दत्ता तू तर अविनाशी
दर्शनमात्रे जळतिल अवघ्या पापांच्या राशी
भावफुलांची ओंजळ भरली
चरण दावि आता ......... ऊठि रे अवधुता!

राजिव नयना स्वामी समर्था या प्रात:काली
आळविति तुज अत्रीनंदना गाउन भूपाळी
सगुण रूप तव दावी सकला
वेळ नको आता ......... ऊठि रे अवधुता!

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP