मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
भज मन स्वामि नाम

श्री स्वामी समर्थ - भज मन स्वामि नाम

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


भज मन स्वामि नाम सुखदायी
दु:ख आपदा दूर कराया
शरण गुरूला जाई

जीवन आहे हे क्षणभंगुर
वृथा कासया हे अवडंबर
दूर करित अभिमान मनीचा
आत्मबोध तू घेई
भज मन स्वामि नाम सुखदायी

दिन-रातीला दु:ख जागते
सोसायचे बळ ना उरते
हताश होता मात्र सदोदित
आत्मवंचना होई
भज मन स्वामि नाम सुखदायी

लोभ प्रलोभन स्वार्थच केवळ
आभासचे फसवे मृगजळ
मार्ग चिरंतन मोक्ष सुखाचा
लाभे प्रभुच्या  पायी
भज मन स्वामि नाम सुखदायी

एकचित हो नामस्मरणी
परम सुखाची ही पुष्करिणी
नामापरते नाही साधन
तल्लिन त्यातच होई
भज मन स्वामि नाम सुखदायी

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP