मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
दत्त मला भेटवा

श्री स्वामी समर्थ - दत्त मला भेटवा

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


दत्त मला भेटवा, स्वामि सखा भेटवा

योगिराज एक भला
वटवृक्षातळि रमला
स्वर्ग तिथे अवतरला
वंदन त्या केशवा, दत्त मला भेटवा

पूर्णब्रम्ह कमलनयन
दत्तराज करुणाधन
नाम तुझे अति पावन
दर्शन दे माधवा, दत्त मला भेटवा

त्रैमूर्ती अत्रिसुता
सकलांची तू माता
अंत नको पाहू अता
धाव पाव केशवा, दत्त मला भेटवा

हे दत्ता धन्य धन्य
भक्तसखा तू अनन्य
तुजविण हे जगत शून्य
शरण तुला माधवा, दत्त मला भेटवा

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP