श्री स्वामी समर्थ - दत्तात्रय अवतार
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
दत्तात्रय अवतार
स्वामी समर्थ जयजयकार
ब्रम्हदेव तू जगनिर्माता
श्री विष्णू तू लोकरक्षिता
शिवशंकर तू भवभयहरता
लीला अपरंपार
स्वामी समर्थ जयजयकार
तू विश्वात्मक त्रीकालज्ञानी
अजानुबाहू सुहास्य वदनी
दीन अनाथांच्या उद्धरणी
अविरत तव संचार
स्वामी समर्थ जयजयकार
दुरितांचे हे तिमिर जावया
अवतरलाशी तू गुरुराया
भक्तालागी देई अभया
तुझ्या पदी आधार
स्वामी समर्थ जयजयकार
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
TOP