मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
भाव धरा रे !

श्री स्वामी समर्थ - भाव धरा रे !

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


भाव धरा रे
आम्ही स्वामींची लेकरे

कशास वणवण फिरता दारी
स्वार्थ आंधळा हा संसारी
शरण जा तुम्ही भावे प्रभूला
नित्य स्मरा रे
आम्ही स्वामींची लेकरे

उच्च नीच हा भेद नसावा
आपपराचा भाव नुरावा
ध्यास निशिदिनी समानतेचा
हृदयी धरा रे
आम्ही स्वामींची लेकरे

लाभविण ते प्रेम असावे
आणि दुज्यांचे अश्रु पुसावे
सेवाभावी जीवन हाची
मार्ग धरा रे
आम्ही स्वामींची लेकरे

भक्ती हे अविनाशी साधन
परम सुखाचा मार्ग चिरंतन
सर्वांभूती एकच ईश्वर
मंत्र जपा रे
आम्ही स्वामींची लेकरे

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP