श्री स्वामी समर्थ - हरिविण
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
नकात बोलू ऐसे तैसे
नको कुणाशी काही
मजला हरिविण करमत नाही
मजला प्रभुविण करमत नाही
प्रज्ञापुरी मी दत्त पाहिले
त्रिभुवन धुंडुन इथे राहिले
भावफुलांनी करता पूजन
प्रसन्न नरहरि होई
मजला हरिविण करमत नाही
स्थिरचरात हा भरुनी उरला
हृदय मांदिरी त्यास स्थापिला
सेवक स्वामी भेद कासया
अंतर उरले नाही
मजला हरिविण करमत नाही
अहंकार आभास फुकाचा
मी, माझे हा भेद क्षणाचा
सत्य असे हे एकच शाश्वत
अंती ईश्वर राही
मजला हरिविण करमत नाही
मी तळमळतो शापित देही
जलावीण का जलचर राही
तू नसता मग कुठले जीवन
तुजविण त्राता नाही
मजला हरिविण करमत नाही
मजला प्रभुविण करमत नाही
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
TOP