श्री स्वामी समर्थ - समर्पण
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
वाहतो शब्दांची ही फुले
शब्दांतुन मी व्यक्त करितसे
अंतर माझे खुले
शब्दचि केवळ धन हे माझे
अन्य धनांचे वाटे ओझे
नसला तरिही सुगंध त्यांना
लाभो तुमच्यामुळे
वाहतो शब्दांची ही फुले
'चाल पुढे का शंकित होशी
भिऊ नको मी उभा पाठिशी !'
भक्तांसाठी शब्दचि तुमचे
संजीवक जाहले
वाहतो शब्दांची ही फुले
सुवर्ण चंपक, गुलाब हसरा
चाफा, जाइजुई, मोगरा
नाव फुलांना नसे माझिया
नाते प्रभुशी जुळे
वाहतो शब्दांची ही फुले
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
TOP