श्री स्वामी समर्थ - भजन करा हो!
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
भजन करा हो, भजन करा
दत्त कृपेची आस धरा
समर्थ आहे तुमच्यापाशी
आत्मसुखाच्या उदंड राशी
लीन व्हा सुखे गुरुचरणांशी
अविरत स्वामी स्मरा
भजन करा हो, भजन करा
संकटनाशन, तारक प्रभु हा
भस्म लेपुनी अवघ्या देहा
त्रिकालज्ञानी भक्त सखा हा
आनंदाचा झरा
भजन करा, हो, भजन करा
योगीराज हा सूर्यनभीचा
प्रकाशदाता या धरतीचा
नामस्मरणी रंगुनी जा हो
मार्ग सुखाचा खरा
भजन करा हो, भजन करा
म्हणा मुखे नरहरी दिगंबर
समर्थ स्वामी हा योगेश्वर
व्यापुन उरला अवघे स्थिरचर
तया मानसी धरा
भजन करा हो, भजन करा
N/A
References : N/A
Last Updated : May 25, 2023
TOP