मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
दयार्णव

श्री स्वामी समर्थ - दयार्णव

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


श्री क्षेत्र अक्कलकोटी जाऊ
दयार्णव स्वामी समर्था पाहू

अमृतयोगी इथे प्रगटला
'गीतधर्म' स्वये आचरिला
विनम्रभावे चरणांवरती
भावफुलांना वाहू
दयार्णव स्वामी समर्था पाहू

जगजेठी हा लेकुरवाळा
नित्य इथे भक्तांचा मेळा
व्याप ताप संताप हराया
सन्निध त्याच्या राहू
दयार्णव स्वामी समर्था पाहू

माय माऊली हा सर्वेश्वर
ध्यान हरीचे अभिनव सुंदर
जीवनपथ हा पार कराया
गीत तयाचे गाऊ
दयार्णव स्वामी समर्था पाहू

हा तर स्वामी चराचराचा
चालक स्थिति लय उत्पत्तीचा
क्षणभंगुर हे जीवन अपुले
चला सार्थकी लावू
दयार्णव स्वामी समर्था पाहू

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP