श्री स्वामी समर्थ - भुलोकीचा समर्थ
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
श्री दत्तात्रय, जय दत्तात्रय, गजर मुखाने करा
भुलोकीचा समर्थ स्वामी सतत अंतरी धरा
गंध रेखिले विशाल भाळा
कंठी रुद्राक्षाच्या माळा
माय, माऊली, कृपा साऊली सदैव चित्ती स्मरा
श्री दत्तात्रय, जय दत्तात्रय, गजर मुखाने करा
घेता दर्शन गुरुचरणांचे
शमन होतसे शांत पापांचे
कृपासिंधु अवधुत दयाघन कल्पतरू आसरा
श्री दत्तात्रय, जय दत्तात्रय, गजर मुखाने करा
जगदोध्दारका हा अवतारी
मुक्तिसंपदा याच्या दारी
नतमस्त्क व्हा श्रीगुरुचरणी, आत्मसुखाते वरा
श्री दत्तात्रय, जय दत्तात्रय, गजर मुखाने करा
भुलोकीचा समर्थ स्वामी सतत अंतरी धरा
N/A
References : N/A
Last Updated : May 23, 2023
TOP