मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि| वचन १८१ ते २०० महाभारतसुभाषितानि प्रस्तावना अठरा पर्वांची नांवें वचन १ ते २० वचन २१ ते ४० वचन ४१ ते ६० वचन ६१ ते ८० वचन ८१ ते १०० वचन १०१ ते १२० वचन १२१ ते १४० वचन १४१ ते १६० वचन १६१ ते १८० वचन १८१ ते २०० वचन २०१ ते २२० वचन २२१ ते २४० वचन २४१ ते २६० वचन २६१ ते २८० वचन २८१ ते ३०० वचन ३०१ ते ३२० वचन ३२१ ते ३४० वचन ३४१ ते ३६० वचन ३६१ ते ३८० वचन ३८१ ते ४०० वचन ४०१ ते ४२० वचन ४२१ ते ४४० वचन ४४१ ते ४६० वचन ४६१ ते ४८० वचन ४८१ ते ५०० वचन ५०१ ते ५२० वचन ५२१ ते ५४० वचन ५४१ ते ५६० वचन ५६१ ते ५८० वचन ५८१ ते ६०० वचन ६०१ ते ६२० वचन ६२१ ते ६४० वचन ६४१ ते ६६० वचन ६६१ ते ६८० वचन ६८१ ते ७०० वचन ७०१ ते ७२० वचन ७२१ ते ७४० वचन ७४१ ते ७६० वचन ७६१ ते ७८० वचन ७८१ ते ८०० वचन ८०१ ते ८२० वचन ८२१ ते ८४० वचन ८४१ ते ८६० वचन ८६१ ते ८८० वचन ८८१ ते ९०० वचन ९०१ ते ९२० वचन ९२१ ते ९४० वचन ९४१ ते ९६० वचन ९६१ ते ९८० वचन ९८१ ते १००८ सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन १८१ ते २०० लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला. Tags : mahabharatमहाभारतसुभाषित वचन १८१ ते २०० Translation - भाषांतर १८१उन्मत्ता गौरिवान्धा श्री: क्वचिदेवावतिष्ठते ॥५।३९।६६॥उन्मत्त गायीप्रमाणें, अविचारी लक्ष्मी कोठें तरी राहत असते ! १८२उपस्थितस्य कामस्य प्रतिवादो न विद्यते ।अपि निर्मुक्तदेहस्य कामरक्तस्य किं पुन: ॥५।३९।४६॥प्राप्त झालेल्या विषयाचा त्याग, देहाची पर्वा न करणार्या जीवनमुक्ताच्याही हातून होणें शक्य नाहीं. मग विषयलंपट पुरुषाची गोष्ट कशाला पाहिजे ! १८३ऊधश्चिन्ध्यात्तु यो धेन्वा: क्षीरार्धी न लभेत्पय: ।एवं राष्ट्रमयोगेन पीडितं न विवर्धते ॥१२।७१।१६॥दुधाच्या आशेनें जो गायीची कास कापील त्याला दूध कधींच मिळणार नाहीं. त्याचप्रमाणें अयोग्य रीतीनें (कर वगैरे लादून) राष्ट्राला पीडा दिली असतां राष्ट्राचा उत्कर्ष होत नाहीं. १८४ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे ।धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते ॥१८।५।६२॥(महर्षि व्यास म्हणतात) मी बाहु उभारुन मोठयानें ओरडून सांगतों आहें पण कोणीच माझें ऐकत नाहीं. बाबांनो, धर्मापासूनच अर्थ व काम प्राप्त होतात, त्या धर्माचें आचरण तुम्ही कां करीत नाहीं ?१८५ऊर्ध्वं प्राणा हुत्क्रामन्ति यून: स्थविर आयति ।प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपध्यते ॥५।३८।१॥कोणी वृध्द पुरुष जवळ येऊं लागला कीं तरुणाचे प्राण वर जाऊं लागतात. त्याला सामोरें जाऊन वंदन केल्यानें ते तरुणाला पुन: प्राप्त होतात. १८६ ऋणशेषमग्निशेषं शत्रुशेषं तथैव च ।पुन:पुन: प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न धारयेत् ॥१२।१४०।५८॥ऋण, अग्नि व शत्रु ह्यांचा थोडासा भाग जरी शिल्लक राहिला तरी तो पुन: पुन: वाढूं लागतो, ह्यास्तव त्यांचा कांहीं अवशेष ठेवूं नये. १८७ऋषीणां च नदीनां च कुलानां च महात्मनाम् ।प्रभवो नाधिगन्तव्य: स्त्रीणां दुश्चरितस्य च ॥५।३५।७२॥ऋषिन, नद्या व थोर लोकांचें कूळ, त्याचप्रमाणें स्त्रियांचें दुश्चरित्र ह्यांचे मूळ शोधण्याच्या भरी पडूं नये. १८८एक एव चरेध्दर्मं नास्ति धर्मे सहायता । केवलं विधिमासाध्य सहाय: किं करिष्यति ॥१२।१९३।३२॥केवळ धर्मविधीचा आश्रय करुन स्वत: एकटयानेंच धर्माचें आचरण करावें. धर्माचरणांत दुसर्याच्या साहाय्याची अपेक्षाच नाहीं. मग साहाय्यकर्त्याचा उपयोग काय ?१८९एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च वध्यते ।सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लव: ॥५।३३।५०॥विष एकालाच ठार मारतें आणि शस्त्रानेंसुध्दां एकाचाच घात होतो. परंतु राजाच्या गुपत मसलतींत कांहीं बिघाड झाला, तर तो प्रजा व राष्ट्र ह्यांसहवर्तमान राजाच्या नाशाला कारणीभूत होतो. १९०एकं हन्यान्न वा हन्यात् इषुर्मुक्तो धनुष्मता ।बुध्दिर्बुध्दिमतोत्सृष्टा हन्याद्राष्टं सराजकम् ॥५।३३।४८॥तिरंदाजानें सोडलेला तीर एका प्राण्याचा वध करील न करील परंतु बुध्दिमान् पुरुषानें टाकिलेला बुध्दीचा डाव राजासह सर्व राष्ट्राचा घात करील. १९१एक: क्रुध्दो ब्राह्मणो हन्ति राष्ट्रम् ॥५।४०।८॥क्रुध्द झालेला एक ब्राह्मण सर्व राष्ट्राचा नाश करुं शकेल. १९२एक: क्षमावतां दोषो द्वितीयो नोपपध्यते ।यदेनं क्षमया युक्तम् अशक्तं मन्यते जन: ॥५।३३।५३॥क्षमाशील पुरुषांच्या ठायीं एकच दोष आढळतो, दुसरा नाहीं. तो दोष एवढाच कीं त्याच्या सहनशीलतेमुळें लोक त्याला दुर्बल समजतात. १९३एक: पापानि कुरुते फलं भुड्क्ते महाजन: ।भोक्तारो विप्रमुच्यन्ते कर्ता दोषेण लिप्यते ॥५।३३।४७॥एकजण पाप करतो व त्याचें फळ पुष्कळ लोकांना उपभोगण्यास मिळतें. परंतु हे उपभोग घेणारे अजीबात सुटून जातात आणि कर्त्याला मात्र पापाचा दोष लागतो. १९४एकत्र चिरवासो हि न प्रीतिजनननो भवेत् ॥३।३६।३६॥एकाच ठिकाणीं फार दिवस राहणें सुखावह होत नाहीं. १९५एकमेव हि लोकेऽस्मिन् आत्मनो गुणवत्तरम् ।इच्छन्ति पुरुषा: पुत्रं लोके नान्यं कथंचन ॥७।१९४।५॥ह्या जगांत एक पुत्रच तेवढा आपल्यापेक्षां अधिक गुणवान् व्हावा, असें लोक इच्छीत असतात; दुसरा कोणीही असा वरचढ व्हावा अशी इच्छा करीत नाहींत. १९६एकशत्रुवधेनैव शूरो गच्छति विश्रुतिम् ॥५।१३४।२३॥शत्रूचा वध करणें ह्या एका गोष्टीनेंच शूराची प्रसिध्दि होत असते. १९७एक: शत्रुर्न द्वितीयोऽस्ति शत्रु: अज्ञानतुल्य: पुरुषस्य राजन् ॥१२।२९७।२८॥(पराशरमुनि जनकाला म्हणतात) हे राजा, मनुष्याचा एकच शत्रु आहे, अज्ञानासारखा दुसरा कोणताच शत्रु नाहीं. १९८एकस्मिन्नेव जायेते कुले क्लीबमहाबलौ ।फलाफलवती शाखे यथैकस्मिन् वनस्पतौ ॥५।३॥३॥एकाच वृक्षावर ज्याप्रमाणें फळांनीं भरलेली व फलरहित अशा दोनही प्रकारच्या फांद्या असतात, त्याप्रमाणें एकाच कुळांत अति बलिष्ठ व अत्यंत दुर्बळ पुरुष जन्माला येतात. १९९एकस्मिन्नेव पुरुषे सा सा बुध्दिस्तदा तदा ।भवत्यकृतधर्मत्वात् सा तस्यैव न रोचते ॥१०।३।१३॥मनावर धर्माचा संस्कार झालेला नसल्यामुळें एकाच मनुष्याच्या ठिकाणीं समयानुरुप निरनिराळे विचार उत्पन्न होतात व पुढें ते त्याचे त्यालाच आवडतनासे होतात. २००एकान्ततो न विश्वास: कार्यो विश्वासघातकै: ॥१२।१३९।२८॥विश्वासघात करणार्यांवर पूर्ण विश्वास टाकूं नये. N/A References : N/A Last Updated : March 21, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP