मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.| पदे १३६ ते १४० निरंजन स्वामीकृत मराठी पदें. पदे १ ते ५ पदे ६ ते १० पदे ११ ते १५ पदे १६ ते २० पदे २१ ते २५ पदे २६ ते ३० पदे ३१ ते ३५ पदे ३६ ते ४० पदे ४१ ते ४५ पदे ४६ ते ५० पदे ५१ ते ५५ पदे ५६ ते ६० पदे ६१ ते ६५ पदे ६६ ते ७० पदे ७१ ते ७५ पदे ७६ ते ८० पदे ८१ ते ८५ पदे ८६ ते ९० पदे ९१ ते ९५ पदे ९६ ते १०० पदे १०१ ते १०५ पदे १०६ ते ११० पदे १११ ते ११५ पदे ११६ ते १२० पदे १२१ ते १२५ पदे १२६ ते १३० पदे १३१ ते १३५ पदे १३६ ते १४० पदे १४१ ते १४५ पदे १४६ ते १५० पदे १५१ ते १५५ पदे १५६ ते १६० पदे १६१ ते १६५ पदे १६६ ते १७० पदे १७१ ते १७५ पदे १७६ ते १८० पदे १८१ ते १८५ पदे १८६ ते १९० पदे १९१ ते १९५ पदे १९६ ते २०० पदे २०१ ते २०५ पदे २०६ ते २१० पदे २११ ते २१५ पदे २१६ ते २२० पदे २२१ ते २२५ पदे २२६ ते २३० पदे २३१ ते २३५ पदे २३६ ते २४० पदे २४१ ते २४५ पदे २४६ ते २५० पदे २५१ ते २५५ पदे २५६ ते २६० पदे २६१ ते २६५ पदे २६६ ते २७० पदे २७१ ते २७५ पदे २७६ ते २७९ मराठी पदें - पदे १३६ ते १४० वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathpadनिरंजन रघुनाथपदमराठी पदे १३६ ते १४० Translation - भाषांतर पद १३६यशोदेबाई लाधलें भाग्य आजि वो ॥धृ॥जो कां व्यापक चराचरी । निर्गुण अद्वय श्रीहरि ।तो हा आलासे उदरीं महाराज हो ॥१॥परब्रह्म तुझे घरीं । रांगे आंगणीं ओसरीं ।काय वर्णूं आजि थोरी । वाटे लाज हो ॥२॥सर्व त्रैलोक्यामाझारी । धन्य तूंचि सर्वापरी ।नाहीं उपमा दुसरी । नवलचोज हो ॥३॥स्वामि निरंजन वासी । पूर्ण आनंदाची रासी ।अखंडित तुझेपाशीं । सांगे गूज हो ॥४॥पद १३६सावळा डोला पाहूं तुळशीदळ निर्मळ वाहूं ॥धृ॥पुण्यक्षेत्र पंढरपूर । चंद्रभागा दक्षिण तिर ।चला जाऊनि सत्वर । वाळवंटासी राहूं ॥१॥उभा राहिलासे नीट । पाईं जोडोनिया वीट ।सुंदर नाभीचे निकट । ठेवूनिया बाहू ॥२॥ध्वजापताका लावून । येती साधुसंतजन ।गाती विठोबाचे गुण । घेऊनिया लाहू ॥३॥सर्व सांगे निरंजन । धन्य कलियूगीं कीर्तन ।शुद्ध करोनिया मन । तदूप होऊं ॥४॥पद १३७जय जय भीमरथी भीमरथी । अगाध तवगुण कीर्ती ॥धृ॥प्रगटुनि भीमाशंकरीं । येणें केलें त्वां पंढरपुरीं ।पुंडलिकातें पोटीं । ठेवुनि घेसी हरिपदभेटी ॥२॥तुझिया दर्शनमात्रें । होती दुर्जन जन सत्पात्रें ॥३॥निरंजन सद्भावें । वंदुनि ह्मणतो तवगुण गावें ॥४॥पद १३८येई वो यदुराज मुरारी गोवर्धनधारी ।बुडतों मी भवसागर डोहीं येउनि मज तारी ॥धृ॥अविद्या वायूया योगें गेलों भवडोहीं ।मोहो दुरासद दुर्धर याचे आवर्ताठायीं ।जन्मालयाचे घेरे घेउनि पडिलों प्रवाहीं ॥१॥कामादिक रिपु जळचर यानीं घालुनिया मीठीं ।होउनिया श्रमदायक मोठे झोंबति ममकंठी ।अशा सर्पिणी लागुनि मागें पुरविलीं पाठी ॥२॥त्रासियलों बहु या संसारा स्वामी यदुवीरा ।तुझियाविन जगिं शोधुनि पाहतां न दिसे मज थारा ।उठी अतां धावुनि वेगीं हे दीनोद्धारा ॥३॥निरंजन तव अंकित होउनि मोकलितो धाया ।पूर्ण दयाकर होउनिया तूं दाखवि निजपायां ।नाहींतरि मी तुझिया वांचुनि जातों कीं वाया ॥४॥पद १३९सावळिया पंढरिराया । कां नये दीनाची माया ॥धृ॥मी तों अनाथ दुर्बळ । बुद्धीहीन अमंगळ ।कामक्रोधांनीं सकळ । व्यापिली काया ॥१॥बुडतों भवाचे सागरीं । कोण आह्मासी उद्धरी ।तुझिया वांचुनि श्रीहरी । जातों मी वायां ॥२॥नका पाहूं जी निर्वाण । बहुत झालासे मज शीण ।सद्भावेंसी निरंजन । लागतों पायां ॥३॥पद १४०सत्वरि धावे पावे हो श्रीहरी । विनविति भावें हो भीमकी सुंदरी ॥धृ॥तूं तंव दीनबंधू दयाकर । सदय पूर्णकृपेचा सागर ॥धरिसि भक्तासाठीं अवतार । ह्मणवुनि तूंते हो ध्याते वारंवार ॥१॥रुक्मया माझा बंधु मूर्खरासी । दिधलें तेणें मज चैद्यासी ।वारिता कोणी नाहीं हो तयासी । म्यां तंव तुज हो वरिलें मानसीं ।२।द्विजवरा हातीं पत्रिका धाडिली । किमपि मनिं शंका नाहीं आली ।उद्धटपणें बहु म्यां लिहिली । ह्मणवुनि माझी हो निरसांड केली ॥३॥यदुविरा स्वामी निरंजनवासी । धावुनि आतां येई वो वेगेंसी ।प्राण हे माझे आले कंठापाशीं । रक्षिता होई हो येउनि मजसी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP