मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.| पदे ४१ ते ४५ निरंजन स्वामीकृत मराठी पदें. पदे १ ते ५ पदे ६ ते १० पदे ११ ते १५ पदे १६ ते २० पदे २१ ते २५ पदे २६ ते ३० पदे ३१ ते ३५ पदे ३६ ते ४० पदे ४१ ते ४५ पदे ४६ ते ५० पदे ५१ ते ५५ पदे ५६ ते ६० पदे ६१ ते ६५ पदे ६६ ते ७० पदे ७१ ते ७५ पदे ७६ ते ८० पदे ८१ ते ८५ पदे ८६ ते ९० पदे ९१ ते ९५ पदे ९६ ते १०० पदे १०१ ते १०५ पदे १०६ ते ११० पदे १११ ते ११५ पदे ११६ ते १२० पदे १२१ ते १२५ पदे १२६ ते १३० पदे १३१ ते १३५ पदे १३६ ते १४० पदे १४१ ते १४५ पदे १४६ ते १५० पदे १५१ ते १५५ पदे १५६ ते १६० पदे १६१ ते १६५ पदे १६६ ते १७० पदे १७१ ते १७५ पदे १७६ ते १८० पदे १८१ ते १८५ पदे १८६ ते १९० पदे १९१ ते १९५ पदे १९६ ते २०० पदे २०१ ते २०५ पदे २०६ ते २१० पदे २११ ते २१५ पदे २१६ ते २२० पदे २२१ ते २२५ पदे २२६ ते २३० पदे २३१ ते २३५ पदे २३६ ते २४० पदे २४१ ते २४५ पदे २४६ ते २५० पदे २५१ ते २५५ पदे २५६ ते २६० पदे २६१ ते २६५ पदे २६६ ते २७० पदे २७१ ते २७५ पदे २७६ ते २७९ मराठी पदें - पदे ४१ ते ४५ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathpadनिरंजन रघुनाथपदमराठी पदे ४१ ते ४५ Translation - भाषांतर पद ४१.सद्गुरुला शरण रिघा रे । दुस्तर भवसिंधु तरा रे ॥धृ॥उदास होउनिया संसारा आजि सारा घेउनि सोडुनि द्या घरदारा । आजि दा रा धन हे दृष्टी मागे सारा । आजि सारा मनिं विषयाला विन्मुख व्हा रे ॥१॥सोडुनि द्या सर्व पिपासा आजि पाशा तोडुनि सोडा सर्वहि आशा । आजि आशाश्वत नरदेहे जाइल नाशा आजि नासाग्रासी लक्षुनि मागें पहारे ॥२॥उगेचि कां रे भ्रमतां वाया आजि वाया जातो ऐसे पाडुनि ठाया । आजि ठाया लक्षुनि निरंजन रघुराया । गुरुरायाचें पद पावुनि सुखरूप व्हा रे ॥३॥पद ४२ नोहे नोहे रे तो ब्रम्हज्ञानी ॥धृ॥ ब्रम्हज्ञानी गोष्टी ।बोले निशिदिनीं होउनि कष्टी ॥१॥ पाहुनीया वेदांती । तैसि बळेंचि धरितो शांती ॥२॥सोडुनिया चित्ताला । बळेंचि दंडितसे देहाला ॥३॥धरोनिया ध्यानासि । दृष्टि पाहे झगमगरासी ॥४॥निरंजन गुरुकिल्ली । जरि ते ठाउक नाहीं झालीं ॥५॥पद ४३सद्गुरु मार्तंडा मार्तंडा । अखंड झळके खंडा ॥धृ॥भाजुनिया द्वैताला । निश्चयभरति रोडगा केला ॥१॥चिद्रस पूर्ण स्वयंभा । भरला औटहात कोठंबा ॥२॥येळकोट संसारा । बोलुनि उधळू दहे भंडारा ॥३॥साकळदंड मोहाचा । दिधला सोडुनि श्वानजिवाचा ॥४॥निरंजन हा वाघा । सोहं भुंकुनि स्वरुपीं जागा ॥५॥पद ४४मारतंड चतुराक्षरी मंत्र उच्चारा वाचे । अखंड हृदयीं ध्याता पर्वत जळतिल पापाचे ॥धृ॥ मार्गेश्वर षष्ठीला प्रगटुनि वाढविला महिमा । महादेव अवतार प्रगटला भक्तांचे कामा ।महाळसा निजशक्ति जाउनि पर्णीली रामा ॥१॥रजनीचर दुष्टांचा केळा समूळ संहार ।रक्षाया निजदासांलागुनि झाला अवतार ॥रमताहे अश्वारुढ होउनि तो हा मल्हार ॥२॥तगतगीत भंडार पडुनिया झालारे पति ।तडिद:प्राय शोभे वस्त्र भूषणमंडीत ।तत्पर होउनि श्वान जयाचे संगें धांवत ॥३॥उळमळिलें भूमंडळ स्वरुपा धरितां प्रचंड ।डमरू त्रिशूळ त्यागुनि धरिला खंडा अखंड ।डमरू वाद्यपरि निरंजन हा स्मरतो मार्तंड ॥४॥पद ४५गुरू नव्हे गुरें ह्मणावी पुष्कळ भरला हाट रे ।स्वस्त मिळाले तरी त्यजावे अडक्याचे गुरु साठ रे ॥धृ॥साधु साधु ह्मणवोनि लोकीं बहुतसा बोभाट रे । भलत्यालागी शिष्य करुनि धन घ्यावें अचाट रे ।प्रतिवर्षी शिष्याघरि जावें मोठा पलपलाट रे ॥१॥टोपी माळा घालुनि पुष्कळ टाळविण्याचा थाट रे ।चौबारा बैसुनिया गावें मेळवुनी जन दाट रे ।मोठ्यानें आरडुनि सांगावें केलें जें कां पाठ रे ॥२॥ऐसे गुरु जरि कोणीं केले त्याला लाभला नाट रे ।नरदेहासी येउनि चुकले निजप्राप्तिची वाट रे ।निरंजनपद सांडुनि चढले यमपुरीचा घाट रे ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP