मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १०१ ते १०५

मराठी पदें - पदे १०१ ते १०५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १०१
गुरुचरणीं पाहिली गोदावरी । उठाउठी पातकें जालीं दूरी ॥धृ॥
चरणद्वय तोची हा ब्रह्मगिरी । पदरज निघाली गोदावरी हो ।
कुशावर्त मुद्रांकित वसुंधरी ॥१॥ तयाठायीं जाउनि स्नान केलें ।
बहुजन्माचें पातक भस्म झालें । येणें जाणें एथुनि आतां गेलें ॥२॥
रघुवीर सद्गुरु शेषशाई । ज्ञानगंगा निघाली त्याचे ठाईं ।
निरंजन तयाचे गुण गाई ॥३॥

पद १०२
धन्य स्वामी सगुरु रघुराया । तुझे पायीं ओवाळूं निज काया ॥धृ॥
जन्ममरणाविरहित मज केलें । सुखदु:ख सवेंही लया नेलें ॥१॥
मायामोहो समुळ गेली भ्रांती । चिदानंदीं पावलींसें विश्रांती ॥२॥
अघटीत ऐसें घटवीलें । जीवंतचि असतां मुक्त केलें ॥३॥
निरंजनीं वस्तीसी दिला ठाव । पुसुनिया टाकिलें नांवगांव ॥४॥

पद १०३
मला संसारीं कांहीं सुख नाहीं । किति सांगूं मी तूज मायबाई ॥धृ॥
जेव्हां पासुनि जन्म लग्न झालें । तेव्हां पासुनि सासुर्‍यासी नेलें ।
गुरुमाहेरा नाहिं येऊं दीलें । नित्य जाचिति मला रांड मेलें ॥१॥
कामक्रोधादि सहा दीरभावें । यांनीं मजलागी नीत्य गांजांवें ।
गाल रगडोनि पुढें दांत खावे । त्याच्य जाचाला कीती सोसावें ॥२॥
मन दादूला बहु परद्वारी । घरीं राहिला एके क्षणभरी ।
दृष्टि पाहे लोकाची धननारी । घरीं येउनि मजलागीं मारी ॥३॥
मृत्यू सासूरा बसोनिया द्वारीं । चिंता सासू दूरूनी हाका मारी ।
आशातृष्ना नंदा जावा घरीं । खावुनि घालिती मजवरी चोरी ॥४॥
बया झाला होवर भंव त्याचा । तुझी लागूं दे गुरुमाय वाचा ।
आज निघाला दिन सोनियाचा । निरंजन रघुनाथ साचा ॥५॥

पद १०४
संसारा येवुनि प्राण्या केलेंसि त्वां काय रे ॥धृ॥
घरदाराधनासाठीं । वेचिल्या आयुष्य - कोटी ।
नरदेहा झाल्या तुटी । करिसी हाय हाय रे ॥१॥
लक्षचौर्‍यांशीची फेरी । फिरतांना कोटीवरी ।
काकताल न्यायापरी । नरतन होय रे ॥२॥
नाहीं केलें तीर्थाटन । देवपूजा संतर्पण ।
न वर्णिले हरीगुण । शिणविली माय रे ॥३॥
निरंजन रघुवीर । तो हा भृगु अवतार ।
व्हावयासी भवपार । शरण तया जाय रे ॥४॥

पद १०५
हे गंगा । भवतापत्रयभंगा । प्रियदायक श्रीरंगा । वसलीसे शिवअंगा ।
देवऋषींचे वृंद । धरुनि मनीं छंद । निशिदिनीं इच्छिति तवसत्संगा ॥१॥
हे गोदा । प्रगटुनि विष्णुपदा । करिसी अघतम छेदा । देसी मुक्तिप्रसादा ।
भक्तजनातें संकटिं रक्षुनि लाविसि अपुले नादा ॥२॥
हे गौतमी । बहु तीर्थांची स्वामी । पुरवित गौतम कामी ।
पावन करि निजनामीं । नित्य निरंतर स्नान त्या नांदवि निजसुखधामीं ॥३॥
हे स्वर्धुनी । आत्मसुखाची खाणी । रघुविरगुरुसुखधानी । निर्मळ जीचें पाणी ।
नित्य निरंजन सेवित असतां झाल ब्रम्हज्ञानी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP