मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ४७ व ४८

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


सम्यग्विज्ञानवान् योगी स्वात्मन्येवाखिलं स्थितं ।
एकंचसर्वमात्मानमीक्षते ज्ञानचक्षुषा ॥४७॥

टीका ॥
असंभवना विपरीत भावना सांडुन । जयाचे मन स्वरुपि जाले उन्मन । सोचि सम्यक विज्ञानवाना योगि होय निश्चित ॥३९॥
ऐसा जो योगियाचा राणा । ज्ञानद्रिष्टिकरोनि जाणा । पाहि आपुलिया स्वरुप स्थाना । जगद्दिवर्त सर्वहि ॥४०॥
जैसे उदकावर्‍हि दिसति तरंग । परि उदकचि असे तयाचे अंग । तैसे माझ्या स्वरुपि भासले जग । परि आत्माचि असे मी सर्वहि ॥४१॥

आत्मैवेदं जगत्सर्व मात्मनोन्यन्नकिंचन ।
मृदोयद्वद्घटादीनि स्वात्मानं सर्वमीक्षते ॥४८॥

॥ टीका ॥ जो जो दिसे जगदाभास । तो तो योगि पाहे चिद्विलास । आत्मयावाचोनि सर्वत्रास । न लेखि च सर्वथा ॥४२॥
घटाचा आदिमध्य । अवसानि । मृत्तिकाचि असे येकले पणि । तैसे सर्व दृश्यमात्राचिया स्थानि । आत्माचि पाहे येकला ॥४३॥
ऐसे ऐकोनि सद्गुरुचे वचन । सिष्य बोलता जाला आपण । जि जि स्वामि करुणाघन । विनंति माझी परिसावि ॥४४॥
मृत्तिका घटासि कारण । परि घट कुल्लाळ केला निर्माण । तैसा आत्मा या जगासि कारण । परि जग निर्मिलें कोण्हि हे ॥४५॥ ऐसें ऐकोनिया श्रवणि । स्वामि बोलति मधुरा वचनि । बरवे पुसिले त्वा ये क्षणि । तेचि आतां सांगतो ॥४६॥
मृत्तिका असे उपादान कारण । कुल्लाळ तो निमित्य कारण । ऐसा उभय योगे करुन । घट निर्माण होतसे ॥४७॥
किव्हा मृगजळ भासावया लागुन । सुर्य होय उपादान कारण । माध्यान्ह तो निमित्य कारण । ऐसे उमय कारणे आसति ॥४८॥ तु ह्मणसि मृत्तिका घट दोन्हि येक । परि कुल्लाळ द्वितिय होतो आणिक । तैसा आत्मा जग मिळोनि येक । परि काळ गमे द्वितियत्वें ॥४९॥
तरि ऐसे न ह्मणे गा अळुमाळ । जैसे प्रातर्माध्यान्ह सायंकाळ । वेगळाले गणावे परि सवित्रमंडळ । येकचि असे निश्चित ॥५०॥ तया सूर्य मंडळावर्‍हुन । त्रिकाळाचे होतसे प्रमाण । परि ते काळ नसतीच भिन्न । तयाहुनि वेगळे ॥५१॥
 तैसि आत्मयासि आणि काळसि । वेगळीक नसे निश्चयेसि । आत्माचि काळ जगद्रुपेसि । विजृंभित असे पै ॥५२॥

संमत् वासिष्ट ॥ श्लो० - न जायते म्रियते क्वचित् किंचि त्कदाचन । जगद्विवर्तरूपेण केवलं ब्रह्मजृंभते ॥१॥

॥ टीका ॥ असो योगियांचा राणा । आत्मत्वेचि पाहे सर्वहिजना । आत्मया वाचोनि ठिकाणा । नसेचि त्याते कोठेहि ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP