मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ६ व ७

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


संसार:स्वप्नतुल्योहि रागद्वेषादिसंकुल: ।
स्वकाले सत्यवद्भाति प्रबोधोsसत्यवद्भवेत् ॥६॥

अगा अज्ञानाचिया निद्राभरे । सुटले संसारस्वप्नाचे काविरे । तयामाजि नाना प्रकारें । विश्व तुंतें भासतसे ॥८२॥
नाना विषय नाना भोग । तयाचा उद्देशे द्वेषराग । हार्षशोकादिक प्रसंग । अनुभवासि येताति ॥८३॥
जंवरि हे अज्ञाननिद्रा न मोडे । तंवरि संसार - स्वप्न न बिघडे । रागद्वेषादीक वरपडे । सत्यत्वेंसि भासति ॥८४॥
तेचि आत्मानुभव - जाग्रति । प्राणियासि जालिया निगुति । संसारस्वप्नाची प्रतीति । नाश पावे तत्क्षणिं ॥८५॥
जैसें स्वप्निं स्वप्न पाहूं जाय । तंवरि मिथ्यात्व अनुभवासि न ये । तेचि जागृति जालिया काय । मिथ्या म्हणावें लागतें ॥८६॥ तैसें हें संसार - दीर्घस्वप्न । अज्ञानें वाटे खरेपणें । जेव्हा वास्तवीक होइल तत्वज्ञान । तेव्हां हें वाटेल मिथ्या पैं ॥८७॥
आणीक - ऐकुनि घेइ दृष्टांत । जेणें हा संसार निभ्रांत । मिथ्या रूप तूज सप्रचीत । अनुभवासि येतील पै ॥८८॥

तावत्सत्यं जगद्भाति शुक्तिकारजतं यथा ।
यावन्न ज्ञायते ब्रम्ह सर्वाधिष्ठानमद्वयम् ॥७॥

जंवरि आत्मस्वरूपातें नेणता । तंवरिच जगाचि सत्यत्वता । देव - मानव - स्थिरचरें तत्वता । तथ्य मानि अज्ञानें ॥८९॥
तेचि जालिया शुद्धात्मज्ञान । सत्यत्वें नेघे जगद्भान । सर्वही आत्मा चिद्घन । पाहे ज्ञानद्रिष्टिनें ॥९०॥
जैसि शुक्तिका पडतां उताणि । अज्ञानि तयेतें रजत मानि । नीलपृष्ठिं आणि त्रिकोणी । जंवरि डोळा न देखे ॥९१॥
पाहतां नीलपृष्ठि त्रिकोण । मग रजतबुद्धि मिथ्यापण । चाकचक्विसहित जाण । शुक्तिका येक पाहातसे ॥९२॥
तैसि काढाकाढि न करितां । सर्वाधिष्ठान अनुभवासि येतां । भ्रमाची होउनि निरासता । सच्चिदानंद सर्व गमे ॥९३॥
जंव कार्या कडोनि पाहूं जातां । तंव दिसे जगाचि सत्यत्वता । तेंचि कारण अनुभवें पाहतां । जगद्भान मिथ्या पै ॥९४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP