मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ४०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


नामरूपादिकंसर्वं विहाय परमाथवित् ।
परिपूर्ण्चिदानंदस्वरूपेणावतिष्ठते ॥४०॥

शुद्ध परब्रह्म जें निश्चित । तो ह्मणविजे पै परमार्थ । त्यातें जाणति ते परमार्थवित । ब्रह्मवेत्ते तेचि पै ॥४६॥
ते परमार्थदर्शि नामरूपासि । टाकोनिया निश्चयेसि । परिपूर्ण चिदानंद जें तेणेसि । अभेदत्वें तिष्ठति ॥४७॥
नामरूप ह्मणसि जरि कैसें । तरि तुज सांगतों विन्यासें । तें ऐकोनि घेइ स्वस्थ मानसें । बुद्धिमंता सुपुत्रा ॥४८॥
गौ मानव गज तुरंगम । वनचरें कीटक विहंगम । नाना योनि अधम आणि उत्तम । नामें त्यांचिं वेगळालिं ॥४९॥
तैसेचि वृक्ष आणि पाषाण । आसति वेगळालि नामें करुन । रुपेंहि आसती भिन्नाभिन्न । सर्व दृश्यामात्राचे ॥५०॥
कोणि चतुष्पदे आणि शृगधारि । द्विपदे करचरण युक्त पक्षधारि । अतिशयें स्थूळ शुंडाधारि । नानापरि जीवजंतु ॥५१॥
कोण्ही स्थूळ कोण्ही र्‍हस्व । कोणी दीर्घ कोणी कृश । कोण्ही देह वर्तुळ बहुवस । त्रिकोण चतुष्कोणादि ॥५२॥
कोण्ही श्वेत कोण्ही पीत । कोण्ही सावळें कोण्ही हरित । कोण्ही मीश्रीत - रंग कोण्ही रक्त । कोण्ही चित्रविचित्र पै ॥५३॥
तैशा वेगळाल्या जाती । बहुता प्रकारिच्या आसती । चौर्‍यांशि लक्ष योनिचि ख्याती । जगामाजि असे पै ॥५४॥
हें नामरूप जातिवर्ण । सर्वहि दृश्य मिथ्या मानुन । अविनाश सच्चिदानंद - घन । तद्रूप होवोनि राहे तू ॥५५॥
सद ह्मणिजे त्रिकाळ बाधातीत । चिद ज्ञानरूप प्रकाशवंत । अनंद ह्मणीजे सुखभरित । सुख:खातीत जें ॥५६॥
तुज सांगितलें चिद - अधिष्ठान । तयाचे ठाइं हें त्रैलक्षणें । जाणोनिया तयाचें चिंतन । तद्रुपत्वें करि पां ॥५७॥
तूं ह्मणसील जरि ऐसें । ध्यान करुं जातां त्रिपुटि भासे । तरि ऐकुनि घेइ पा स्वस्थ मानसें । प्रकार त्याचा सांगतो ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP