मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ५६ व ५७

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


॥ तिर्यगूर्ध्वमध:पूर्णं सच्चिदानंदमद्वयं ।
अनंतं नित्यमेकं यत्तद्व्रह्मेत्यव धारयेत् ॥५६॥

अडवि उभि वर्‍हि खालि । सच्चिदानंद वस्तु येकलि । अनंत अपारावारत्त्वें ठेलि । अद्वैत पुर्णपणत्त्वें ॥३२॥
जेथें नाहिं अनेकता । न संभवे अनित्यता । ऐसि जे येक वस्तु तत्त्वता । तें हें ब्रह्म जाण पा ॥३३॥

अतद्व्यावृत्तिरूपेण वेदांतैर्लक्ष्यतेव्ययं ।
अखंडानंदमेकं यत्तद्ब्रह्मेत्यवधारयेत् ॥५७॥

ते नोव्हे तें नोव्हे म्हणउन । उपनिषदें करिति दृश्यनिरसन । जाचा निरास नोव्हे जाण । ते ब्रह्म ऐसें सुचविति ॥३४॥
ऐसें जे का वेदांत सुरस । तिहीं करुन येतसे लक्षार्थास । जें अद्वय अखंडानंद येकरस । तें हें ब्रह्म जाण पां ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP