मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ५८

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अखंडानंदरूपस्य तस्यानंदलवाश्रिता: ।
ब्रह्माद्यास्तारतम्येन भवंत्यानंदिनोजना: ॥५८॥

अखंडानंद ब्रह्मस्वरुपाचा । लेशमात्र अश्रवोनि साचा । ब्रह्मा आदिकरुन आनंदाचा । लवमात्र अनुभव घेती ॥३६॥
सर्वांहूनि देशाधिपतीसि अनंद । त्याजपेक्षां पृथ्विपतिसि आनंद । तयापेक्षांहि असे अनंद । तया गंधर्वालागि पै ॥३७॥
त्या गंधर्वाहूनि इंद्रासि । अनंद असे अतिशयेसि । तया इंद्राहुनिया ब्रह्मयासि । अनंद असे फारसा ॥३८॥
पिप्पिलिकाहूनि ब्रह्मयापर्यंत । ऐसे सर्वहि आसति अनंदभरित । परि तया अखंडानंदाचा लव अश्रित । होय अनंद सर्वाचा ॥३९॥ तेहि आपुलाले माने करुन । लवभरि अनंदी असति जाण । नित्य अखंडदंडयमान । नोव्हे अनंद सर्वाचा ॥४०॥
तो जरि तूं म्हणसिल कैसा । तरी तुज सांगतो गा पाडसा । जेणें तुझे मनि सहसा । संशय न राहे अनुमात्र ॥४१॥
अगा विषयाकार वृत्ति उठे । तेव्हां दु:खाचे बैसति झपाटे । ते विषय प्राप्त जालिया उलटे । वृत्ति मागति अधिष्टानि ॥४२॥
येक लवमात्र वृत्ति स्थीर राहे । तंवरि अनंदसिंधुचा लेश लाहे । मागति विषय चिंतिता पाहे । दु:ख जैसे तैसेंचि ॥४३॥
तूं ऐसा जरि काढिसि उल्लेख । किं विषय भोगितां विषयसुख । तेथें कैचें ब्रह्मानंदसुख । यावत् प्राणिमात्रातें ॥४४॥
तरि तूं ऐसें न म्हणे सर्वथा । विषयांत नसे सुखवार्ता । ब्रह्मसुखचि विषय भोगिता । निश्चयेंसि जाण तुं ॥४५॥
जैसें श्वान अस्तिप्रति घेउन । दाढेखालि चाविता जाण । ते शुष्क अस्थि हिरडीस लागुन । रक्त निघे तेथिचें ॥४६॥
तें स्वकीय रक्त प्राशन करुन । अस्तींतिल रक्त मानि श्वान । तैसें अज्ञानि पामरजन । सुख विषयाचेचि मानिताति ॥४७॥
असो जें जें कांहिं । तें ब्रह्मावाचोनि सर्वथा नाहि । ऐसें जाण पा निश्चइं । विचार युक्ति करोनि ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP