आत्मबोध टीका - श्लोक ६६ व ६७
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
श्रवणादिभिरुद्देप्तो ज्ञानग्निपरितापित: ।
जीव: सर्वमलान्मुक्त: स्वर्णवद्द्योतते स्वयं ॥६६॥
अनादि संसार प्रवाहि पडिला । जीव देहासंगें देहत्व पावला । कामक्रोधादि मले व्यापिला । होता जो का बहुकाळवर्हि ॥८॥ पडोनिया आपुला विसर । जीव मळीन जाला होता फार । तंव स्मरणें करुन ज्ञानाग्नि परिकर । प्रदिप्त केला सुविचारेम ॥९॥ तयामाजि जीवाचे शोधन । केलें असतां निजव्यासे करुन । कामक्रोधादि मळ संपूर्ण । दग्ध होति क्षणमात्रें ॥१०॥
मग शुद्ध स्वप्रकाशमान । जीव होतसे सच्चिदानंदघन । जैसे तावोनि काढिता सुवर्ण । हीनत्व सांडोनि उजळे होय ॥११॥
हृदाकाशेदितोह्यात्मा बोधभानुस्तमोपहृत् ।
सर्वव्यापी सर्वधारी भाति भासयतेsखिलम् ॥६७॥
टी० - हृदय आकाशाचिये ठाइ । अज्ञान तम दाटले होते पाहि । ते बोध भानु प्रकटोनि लवलाहि । हारण केलें सर्वस्वें ॥१२॥
जो गुरुकृपे हृदइं प्रगटला । तोचि आत्मा सर्वि व्यापला । सर्वाधार होवोनि ठेला । सर्व प्रकाश - रूपत्वें ॥१३॥
जैसे माध्यान्हि सुर्यप्रकाशि । मृगजळें लागति वाहावयासि । आनि सुर्याचे तयातें प्रकाशि । अपुलीया प्रकाशें ॥१४॥
तैसे आत्म शक्तिचे ठाइं । हें सर्व जग भासले पाहि । आणि आत्मप्रकाशें प्रकाशितही । होत असे दृश्यजात ॥८१५॥
एवं जगाचे आदिमध्यावसानि । आत्माचि असे येकले पणि । ऐसि जयाचि अनुभव खाणि । घडली तो धन्य पै ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP