आत्मबोध टीका - श्लोक ६५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
सर्वगं सच्चिदात्मानं ज्ञानचक्षुर्निरीक्षते ।
अज्ञानचक्षुर्नेक्षेत भास्वंतं भानुमंधवत् ॥६५॥
टी० :- भानु तरि प्रकाशमान विलसे । परि चक्षुहीनातें अंध:कार भासे । तैसा अज्ञान चक्षुने न दिसे । आत्मा सर्वत्र असताहि ॥९७॥
जयाचें सद्गुरुकृपेकरुन । जावोनि अज्ञान तिरोधान । उजळले असति ज्ञान नयन । त्यातेचि दिसे सर्व आत्मा ॥९८॥
जैसा डोळसालागि भानु । दिसे सर्वत्र प्रकाशमानु तिळभरि तमाचा ठिकाणु । न पाहेचि कोठेहि ॥९९॥
तु ह्मणसि ज्ञानियाते । चर्म चक्षु नसतील निरुते । तरि ये विषइचा प्रकार तूते । सांगतो तो ऐक पा ॥८००॥
जैसा अज्ञानिया लागुन । अकार दिसे चर्म चक्षु करुन । तैसाचि ज्ञानियातेही जाण । अकार दिसे चर्मनेत्रें ॥१॥
परि तया अज्ञानापेक्षया । विशेष ज्ञानद्रिष्टि असे ज्ञातया । तेणे करूनि अकाराचा ठाया । निराकार ब्रह्म पाहातसे ॥२॥
जैशा मृगजळाहूनि वेगळेपणे । रस्मि पाहिल्या असति जेणे । तो मृगजळातहि रस्मीच जाणे । कारणरूपें करोनिया ॥३॥
मृगजळ डोळियाते दिसे । उदका सारिखे स्पष्ट भासे । परि बुद्धिप्रति रस्मीच असे । प्रबुद्धाचा जापरि ॥४॥
तैसे दृश्याहूनि वेगळेपणे । ज्याते गुरुमुखे समजलि आत्मखुण । तोचि तया कारणरुपेंकरुन । जगत्कार्यहि पाहातसे ॥८०५॥
त्याचा चर्मचक्षुनें जग दिसे । परि शुद्ध बुद्धिते आत्माचि असे । त्या सच्चिदानंद स्वरूपि गिवसे । दृश्यमात्र सर्वहि ॥६॥
ऐसा जो आपणांते । स्मरला । तोचि प्राणि कृतार्थ जाला । जेणे अज्ञानबंध मुक्त केला । स्वस्वरूपज्ञानेसि ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP