मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक ४३ व ४४ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक ४३ व ४४ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक ४३ व ४४ Translation - भाषांतर अरुणेनैव बोधेन पूर्वं संतमसेहृते ॥तत आविर्भवेदात्मा स्वयमेवांशुमानिव ॥४३॥प्रथमबोध अरुणोदये करुन । होतसे अज्ञानतमहानन । सवेचि आत्मा प्रकाशघन । भानुवत् अयुर्भवे ॥७७॥ तव सिष्य ह्मणे जि गुरुराया । आत्मा पहिलाचि होता ठाइचा ठाया । मग बोधे - करोनि कोठोनिया । कधिक अणिला सांगा जि ॥७८॥ मग श्रीगुरु ह्मणे रे तान्हवा । हे सत्यचि ह्मणसि गा मम प्रिया । परिभ्रमला होतासि तू वाया । अविद्यायोगें करुनि ॥७९॥आत्मा तु सततं प्राप्तोsप्यप्राप्तवदवियद्या ॥तन्नाशे प्राप्तवद्भाति स्वकंठाभरणं यथा ॥४४॥आत्मा तरि सतत प्राप्त असे । परि अविद्यायोगें अप्राप्तवत् भासे । तें अज्ञान जेव्हा सर्वस्वें नासे । तेव्हा वाटे प्राप्तवत् ॥८०॥ जैसि कोण्हियेक स्त्री उतावळि । मुख प्रक्षालना बैसे उष:काळि । नाशिकींचे मोति तयेवेळि । काढोनि खोविले गळसुत्रि ॥८१॥ सर्वचि ग्रहकार्याप्रति करितां । बहुत काळ जाला लोटतां । मग मोति नाकि पाहु जातां । न लागेचि हास्तातें ॥८२॥ तेव्हां जावोनिया माजघरिं । पाहु लागलि चौफेरि । सवेचि उतरंडि खालि वर्हि । उतरोनिया पाहातसे ॥८३॥ मग अंग टाकोनि भूमिवर्हि । अक्रंदोनि खेद करि । सवोचि झाडोनिया खोलि वोसरि । केराप्रति पाखडि ॥८४॥ तव येक पिचकि सेजारिण । तयेचा ग्रहाप्रति येउन । पुसति जालि वर्तमान । काय जाले ह्मणउनि ॥८५॥ ति ह्मणे वो सखे साजाणे । मोति हारपले वो माय बहिणि । विळभरि पाहिले धुंडाळुनि । परि मोति न सापडे सर्वथा ॥८६॥ ऐसे ऐंकोनि तयेचें वचन । सेजारिण बोले अभय देउन । मोति येथेंचि असेल जाण । शोक न करि सर्वथा ॥८७॥ असो तया बाइचा सखा । पिताचि ग्रहासि अला देखा । तो म्हणे अतिशये सेवोनि शोका । काय बाइ पाहासि ॥८८॥ तिणें सांगताचि वृत्तांत । तेणें हास्य करोनिया त्वरित । म्हणे पाहे पा स्वकंठांत । शुद्ध हास्ते करोनि ॥८९॥तिणे स्वकंठि चापचु जातां । चामकिर लागले तिचे हाता । मग शोक सांडोनिया तत्वता । अनंदयुक्त जाहलि ॥९०॥ मग प्रात:काळिंचा मुख प्रक्षाळणा । स्मरति जालि ते हास्यवदना । म्हणे मोति मजपासि असताना । उगिच भ्रमले होते मि ॥९१॥ तैसि गा सिष्य सुमति । आत्मा विसरोनि तुझि मति । चार्हि वेद ग्रह धुंडाळिति झालि होति चिरकाल ॥९२॥ सवेंचि शास्त्राचिया अंगणिं । आत्मा पाहिला हुडकोनि । मागति योगबळे देह शोधोनि । केर काढिला अमंगळ ॥९३॥ करोनि नासा पुटाचे सुप । वायो बळे केर काढिला अमुप । परि निज डोळा चिद्रत्न स्वरुप देखिले नाहि कदापि ॥९४॥ षड्चक्र उतर्डिं खालि वर्हिं । शुशुम्ना भानवसिते पाहिले परि । आत्ममोति अनुभवाचे करि । लागलेचि नाहि ॥९५॥ शमदमाचिये वोसरिवर्हि । शरीर अपटिलें नानापरि । परंतु चिद्रत्नाचि कांति बरि । स्वप्नींही न पाहिलि ॥९६॥ जैसि पिचकि सेजारिण । तैसे परोक्ष ज्ञानि शास्त्रि निपुण । अंधचि ते ज्ञानचक्षुविण । आत्म्यासि काय जाणति ॥९७॥ त्याणि कथिले तु आत्मा अहेस । परि जाला नाहि अज्ञान ध्वंश । ऐसे वेदांत प्रकर्णहि बहुवस । त्याचे मुखे ऐकिले ॥९८॥ असो तू श्रोता अससि चतुर । माते वाटलासि प्रियकर । ह्मणोनि सांगताचि आत्मविचार । अपरोक्ष आत्मा जाणिलासि ॥९९॥ तो आत्मा तरि तु पहिलाचि आससि । परि अज्ञान योगे भ्रमला होतासि । तें अज्ञान नासतां तुझे तुजपासि । अनादि अहेसे कळु अलें ॥६००॥ असो या व्यतिरेकाचा अगोधर । अध्यारोप कथिला सविस्तर । तुझेंचि अज्ञान घेवोनि परिकर । तेंचि तूतें उपपादिले ॥१॥ किं ब्रह्म स्वरूपि माया जालि । तें स्थावर जंगमादिक प्रसवलि । परि ते उगीच अरोपिलि । शुद्ध स्वरूपावरोति ॥२॥ जैसा वाधिचा साप करुन । गारोडि दाखविति खरेंपण । सेवटिं वाधि स्पष्ट दाखउन । सर्पालागि निवारि ॥३॥ आदि अवसान मध्यंतरि । ती वाधिचि वाधीच होति खरि । परितेणे करोनि बाजिगिरि । द्रिष्टिबंधन केलें होतें ॥४॥ त्या गारोडियाचि बाजिगिरि । कोण्हीयेक सिकला जरि । त्याते वाधि दिसे सर्वापरि । सर्प द्रिष्टि न दिसता ॥५॥ असो तैसें ईश्वर माये करून । पडलेसें जगातें अज्ञान अवरण । आत्मस्वरूपातें नेणुन । जगदाकारें भासलें ॥६॥ संमत गीता श्लोक :- “ दैवीह्येषा गुणमयी मममाया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरंति ते ॥१॥ ”ऐसि ईश्वर माया दुरत्यय । जीवासि दाखवि नानापरि भय । तिचा जरि व्हावा वाटला जय । तरि जीवेश्वरि ऐक्य व्हावे ॥७॥ त्या जीवेश्वर ऐक्य विद्ये करुन । जावोनि मायेचे अज्ञान अवरण । सच्चिदानंद आत्मा परिपूर्ण । सर्वहि गेम निश्चित ॥८॥ मग तया ज्ञानिया लागुन । मिथ्यत्वें वाटाए जगद्भान । ते कैसे ह्मणसि तरि अपवाद लक्षण । तुजलागि सांगतो ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP