मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ६१ व ६२

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


यद्भासाद्भास्यतेsर्कादि भास्यैर्यत्तु न भास्यते ।
येन सर्वमिदं भाति तद्ब्रह्मेत्यवधारयेत् ॥६१॥

जाचा प्रकाश मात्रें करुन । सुर्यादिक होति प्रकाशमान । अप्रि सूर्यादिक आत्मया लागुन । प्रकाशुं न सकति सर्वथा ॥५५॥
जेणे करोनि हें सर्व भासे । तें स्वतंत्र स्वप्रकाश असे । जयातें पर अपेक्षा नसे । तें हें ब्रह्म जाण पा ॥५६॥

स्वयमंतर्गतंव्याप्य भासयन्नखिलं जगत् ।
ब्रह्म प्रकाशते वन्हि: प्रतप्तायसपिंडवत् ॥६२॥

सर्वहि जगाचा अंतरगत । ब्रह्मचि स्वयें होवोनि व्याप्त । आणि ब्रह्मचि स्वयें प्रकासीत । आपुलिया प्रकाशें ॥५७॥
जैसा लोहोपिंडा माझारि अग्नि व्यापोनि सर्वापरि । आणि अग्निच प्रकाशित करि । तया लोहोपिंडाते ॥५८॥
किं जैसा नट आणिता होय सोंग । तेव्हां तो नटचि हो सोंगाचें अंग । आणि नटचि दाखविता होय अव्यंग । सभेमाजि त्या सांगातें ॥५९॥
मग सिष्य म्हणे महाराजा । जगचि ब्रह्म कां न म्हणावें बोजा । जरि ब्रह्मावाचोनि पदार्थ दुजा । नसे या जगता माझारि ॥६०॥ मग श्रीगुरु म्हणति ऐक वचन । सांगतों अन्वय व्यतिरेके करुन । जेणें कदापि नोव्हे जगद्भान । तुजलागि निश्चित ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP