मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक १९ व २०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


आत्मचैतन्यमाश्रित्य देहेंद्रियमनोधिय: ।
स्वकीयार्थेषु वर्तन्ते सूर्यालोकं यथा जन: ॥१९॥

आत्मा नित्यज्ञानस्वरुपचैतन्य । इंद्रिय मनबुद्धि त्या अश्रयेंकरुन । आपुलाल्या विषयाप्रति जाण । सेवन करिति निश्चइं ॥३८॥ जैसें सूर्याचा प्रकासें करुन । व्यापारिं प्रवर्तति सर्वही जन । परि सूर्य तयाहूनि असे भिन्न । अकर्तेपणें सर्वदा ॥२३९॥
तैसें आत्मचैतन्य योगें करुन । देहेंद्रियबुद्धि आणि मन । प्रवर्तति स्वविषयालागुन । परि आत्मा आकर्ता निश्चइं ॥२४०॥
आतां आत्म्याकडेस कर्तेपण । लावावयासि काय कारण । हें तुजप्रति सांगतों जाण । सावधपणें परियेसि ॥४१॥

देहेंद्रियगुणात्कर्माण्यमले सच्चिदात्मनि ॥
अध्यस्यन्त्यविवेकेन गगने नीलिमादिवत् ॥२०॥

देहेंद्रियाचि गुणकर्में सर्वहि । निर्मळ सच्चिदात्म्याचे ठाइं । लाविति अज्ञानें करोनि पाहि । जैसि गगनातें नीलिमा ॥२४२॥
कर्ता करविता सर्वहि आत्मा । ऐसें बोलति जन पापात्मा । तत्वज्ञानि जो महात्मा । तो न म्हणेचि ऐसें पैं ॥४३॥
देहाचि बाल्ययौवनजरा । इंद्रियें सेवेति विषयचारा । कामक्रोधादीक पसारा । अंत:करणधर्म पैं ॥४४॥
ऐसे वेगळे वेगळे प्रकार । असतां देहेंद्रियगुणविकार । नेणोनि अज्ञानि जन पामर । आत्मत्विं सर्व लाविति ॥२४५॥
जैसें निर्मळ आसतां गगन । तयातें म्हणति नीलवर्ण । परी तें काळें नसेचि जाण । शुद्ध असे निश्चइं ॥४६॥
पाहाणाराचें बुबळ काळें । म्हणोनि त्यास नभ दिसे निळें । तैसा अज्ञान्यासि अज्ञानबळें । आत्मा दिसे कर्ताचि ॥४७॥
पीवोनि अज्ञानाचि मदिरा । उगेचि बोलति सैरावैरा । म्हणति आत्मा कर्ता खरा । सर्वापरि निश्चित ॥४८॥
कर्णिं नायकावे त्याचे बोल । सांडावे मानोनीया फोल । विचार नेणोनि अतिसखोल । अज्ञानवसें बोलति ॥४९॥
येविषइं आणीकही दृष्टान्त । तूंतें सांगतों मी निश्चित । जेणें आत्मा अकर्त निभ्रांत । अनुभवासि ये तुझ्या ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP