आत्मबोध टीका - श्लोक ५१ व ५२
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
वाह्यानित्यसुखासक्तिंहित्वामसुखनिर्वृत: ।
घटस्थदीपवच्छश्वदंतरेव प्रकाशते ॥५१॥
टी० - शब्दस्पर्श रूप रस गंध । हे बाह्य विषय असति पंचविध । जे इंद्रिय योगें जग अबत्ध । क्षणैक सुख सेविताति ॥६६॥
ते अनित्य जाणोनि निश्चित । जो आत्मसुखीच असे रत । जैसा दीप ठेविला असता घटांत । तो घटा अंतरि विलसतसे ॥६७॥ तैसा निजात्मसुखें करुन । जो अखंडित असे निमग्न । तो मग बाह्य विषयाचि जाण । इच्छा न करि सर्वथा ॥६८॥
तुं ह्मणसि तो काइ येक न करि । कर्मि वर्ते अन्यत्राचीये परि । अन्नवस्त्रादि करोनि सर्वत्रि । सेविता दिसे मुनिवर्य ॥६९॥
तरि येविषइं एकवचन । तो सेवित दिसे दुजालागुन । परि तो कांहींच न करि जाण । आपुलिया अनुभवें ॥७०॥
उपाधिस्थोपितद्धमैर्नलिप्तो व्योमवन्मुनि: ।
सर्वविन्मूढवत्तिष्ठेदसक्तो वायुवच्चरेत् ॥५२॥
टी० - तो देहाचिया संगि असता । तयाचा धर्मे न लिंपे तत्वता । मी कर्ता आणि मी भोक्ता । न ह्मणेचि तो कदापि ॥७१॥
मी सुखि दु:खि आणि दुर्बळ । मी पापि आनि पुण्यसीळ । मी सदय निर्दय आणि खळ । न म्हणोचि तो सर्वथा ॥७२॥
जरा मरण क्षुत्पिपासा । भयशोकादिकाचा वळसा । हे साहि विकार तो सहसा । अपुल्याकडे न घेचि ॥७३॥
जरा मरण देहधर्म । क्षुत्पिपासा हे प्राणाचे कर्म । भय शोकादिक संभ्रम । मनाचाचि असे पै ॥७४॥
ऐसें जाणोनिया अंतरि । तो प्रारब्धाचा क्षय करि । साक्षित्वें नभाचिया परि । अलिप्त सर्वां अचरणि ॥७५॥
असोनि सर्ववित् सर्वज्ञ । लोकासि दिसे जैसा मूढ अज्ञ । कोण्हीच जयाते न म्हणे तज्ञ । ऐसा राहे साधारण ॥७६॥
यथासांग कर्मेंही करि । परि तो करोनि अकर्ता निजनिर्धारि । ब्रह्मचर्यादि अश्रम चार्हि । लिलामात्रें वर्ततसे ॥७७॥
आतां फार सांगु काइ । तो सर्व करोनि अकार्ता पाहि । लिप्त नसे कोण्हेहि ठाइ । वायुपरि तो मुनिवर्य ॥७८॥
तंव सिष्य ह्मणे जि गुरुराजा । आपण जे सांगितले वोजा । परि यथेष्टाचरणियाचे काजा । येउ पाहाति हे वचनें ॥७९॥ यथेष्टाचरणि ह्मणे मी अकर्ता । काहि भय नसे मज पाप कर्ता । ऐसे वदोनि दुष्ट कर्में अचरता । होय अत्यादरेसि ॥८०॥
तो पेउ नये तेचि करि पान । खाउ नये ते चि करि भक्षण । अचरु नये तेचि अचरण । करी अत्यादरेसि ॥८१॥
ह्मणवोनि आपणाप्रति मुक्त । स्नान संध्यादि कर्मे समस्त । टाकोनि उगाचि किडे स्वस्थ । पशुचीया सारिखा ॥८२॥
दुष्ट कर्मां लागि करिता । ह्मणे मी याचा साक्षि अकर्ता । कर्तृत्व सर्व देहाचा माथा । नसे मजकडे काहिही ॥८३॥
ऐसा जो का यथेष्टाचरणि । तो हे वचन साह्य करोनि । उगेचि पाषांड वाढवील जनि । स्वामिराया मज वाटे ॥८४॥
सद्गुरू ह्मणति तू ऐसा न ह्मणे । तो ज्ञानीच नोव्हे ऐसा जाणे । आरे ज्ञानियाप्रति यथेष्टाचरणें । कैसी संभवति सांग पा ॥८५॥ जन्मजन्मांतरि सदाचरण । करिता जाले तत्वज्ञान मग कैचे करील यथेष्टाचरण । पुर्वाभ्यासा वाचोनि ॥८६॥
जैसा रणकंदना माझारि । योद्धा असीलता घेवोनि करि । तो युद्ध करिता भोमीवर्हि । मस्तक पडिले परशस्त्रे ॥८७॥
अंगि होता वीरस्त्रिचा वारा । तेणे कबंध धावे सैरावैरा । मग काय तेव्हां सांडोनि प्रथम शस्त्रा । घेइल नुतन शस्त्राते ॥८८॥
किंव्हा कुल्लाळाचे घरिचें चक्र । फिरत होते सव्याकार । ते मडके उतरिलिया वर्हि न फिरे । अपसव्ये करोनि ॥८९॥
किव्हा हतचा पाहुनि सुटला बाण । तो पुर्वेचे वेधोनि विंदान । जैसा पुर्वेसीच करि गमन । पश्चमेसि न फिरता ॥९०॥
तैसा तो मननसीळ मुनि । सत्कर्में जाला ब्रह्मज्ञानि । मग तैसाचि वोघ सदाचरणि । चाले त्याचा सेवटवर्हि ॥९१॥
पहिले सांडावें सदाचरण । नवे करावे असदाचरण । इतुका तरि खटाटोप कोण । करि तया योगियाचा ॥९२॥
तस्मात् जाते वास्तवीक नाहि ज्ञान । तोचि करि यथेष्टाचरण । हेचि त्याचि बोळखण ।निश्चयेसि जाण पा ॥९३॥
संमत् वासिष्ठ ॥ श्लो० ॥ - सांसरिकसुखासक्तो ब्रह्मास्मीतिच वादिन: । कर्म ब्रह्मोभयं भ्रष्टं तंत्यजेदंत्यजं यथा ॥१॥
संसार सुखाचे ठाइ रत । आणि मी ब्रह्म ऐसे उचारित । कर्म ब्रह्म उभइ अंचवत । तो अंतेजवत त्यजावा ॥९४॥
संमतगीता ॥ श्लो० ॥ - येहिसंस्पर्शजाभोगा दु:खयोनय एवते । आद्यतवंत: कौंतेय न तेषु रमते बुध: ॥१॥
ऐसि भगवद्वाणि निश्चित । ज्ञानि विषयाचे ठाइ नसे रमत । दु:खरूप जाणोनि अंतवंत । सांडि विषया लागुनि ॥९५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP