आत्मबोध टीका - श्लोक ३८
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
मूळ ग्रंथात ३८ नंबरचा श्लोक नाही, म्हणून या श्लोकाला ३८ नंबर दिला आहे.
संमत गीता ॥ श्र्लोक० ॥ :-
ध्यायतो विषयान्पुंस: संगस्तेषूपजायते । संगात् संजायते काम: कामात्क्रोधोभि जायते ॥१॥
क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम: । स्मृति - भ्रंशाद्बुद्धि नाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥२॥ ॥३८॥
यास्तव जन - संगातें सोडून । येकांत स्थळातें पाहून । घालोनि तेथें स्वस्तिकासन । मृदु आसनिं बैसावें ॥४३॥
कुट गिरि पर्वत कंदर । जेथें व्याघ्रादि पशु अति क्रूर । ऐसें अत्यंत स्थळ जें भयंकर । तेथें न राहावें साधकिं ॥४४॥
जैंसा कोण्ही येक मत्कुनाच्या भयानें । निजला अरण्यामाजि जाउन । तेथें अरण्यपशूनें येऊन । विदारिला सर्वस्वें ॥४५॥
तैसा साधकें जनसंग सोडिला । पर्वतामाजि जावोनि राहिला । तेथें जरि व्याघ्रानें देहचि नेला । मग साधनाला कोण करि ॥४६॥ आथवा प्रयासें जरि वाचला । तरी तेथें न मिळे भक्षावयाला । फळ मूळ शोधितांचि काळ गेला । मग साधन केव्हां करावें ॥४७॥ यास्तव जातें आत्मप्रयोजन । तेणें उभय भयाप्रति चुकउन । येकांत स्थळाप्रति पाहुन । वास करावा पै तेथें ॥४८॥
अराम मठिका देवालय । अथवा ग्नामासनिध स्थळ होय । येकांत आणिक निर्भय । तया स्थानिं वसावें ॥४९॥
येकांत स्थळिं बैसल्यावर्हि । मन विषयाचि चिंतना करि । या करितां वैराग्य अंतरिं । क्रोधरहित सेवावें ॥५०॥
तें वैराग्य असे द्वि प्रकारिं । येक बाह्य येक अंतरिं । तयाचि अनुक्रमें कुसरि । तुजलागि सांगतों ॥५१॥
ऐक बाह्य वैराग्य लक्षन । कदापी न सेवावें मिष्टान्न । उत्तम वस्त्राप्रति जाण । घेउं नये सर्वथा ॥५२॥
करावें सीतोष्नाचें सहन । अश्रम परत्वें लघु वस्त्र वेष्टुन । फळ मूळ कंद आणि कदान्न । सेवित जावें स्वल्पत्वें ॥५३॥
कनक आणि कामिनिचा त्याग । सर्वस्वें करावा गा सुभग । यया नामें बाह्य वैराग्य । स्वल्प प्रकारें कथियलें ॥५४॥
अतां अंतर वैराग्य तें कैसें । ऐकोनि घेइ स्वस्थ मानसें । मनालागि विषयाचें पिसें । स्वाभावीक असे अनादि ॥५५॥
मन अप्राप्त । विषय इच्छा करि । राज्यलक्षुमि असावि घरिं । सुपुत्र आणि पवित्र अंतुरि । स्वरूपवति असावि ॥५६॥
म्या सुखि असावें सर्वकाळ । नसावा मज दु:खाचा विटाळ । न भक्षो या शरिरासि काळ । कोटि कल्प गेलिया ॥५७॥
हें शरीर तेजस्वी आसावें । उत्तम पक्वान्नातें खावें । उत्तम वस्त्रालागि नेसावें । उपभोग घ्यावें सर्वहि ॥५८॥
ऐसें इह लोकिचे आसावे भोग । मेल्यावरि मज व्हावा स्वर्ग । तेथें अमृत - प्राशन देवांगणासंग । चिरकालत्वें असावे ॥५९॥
यापरि मनामाजि इच्छा वासना । अखंडितपणें असति जाणा । त्या कदापि आणुं नये मना । या नामें अंतर वैराग्य ॥६०॥
नको नको हें मज सर्व कांहिं । विषय भोगितां सौख्य नाहिं । मग मी याचि चिंतना करुं तें काइ । या नामें अंतर वैराग्य ॥६१॥ या विषयाचा संग केला । ह्मणोनि सर्वस्वें नाश जाला । अहाहा नरदेह व्यर्थ चालिला । या नामें अंतर वैराग्य ॥६२॥
यापरि वैराग्याचि रिति । तूतें काथिलि यथानिगुति । आतां इंद्रिये जिनावयाचि गति । सांगतों ते ऐक पां ॥६३॥
श्रोत्र त्वग् चक्षु जिव्हा घ्राण । हे पंच ज्ञानेंद्रिय असति जाण । ते पंच कर्मेंद्रियासहित आपण । विषयावर्हि धावति ॥६४॥
ते ज्ञानेंद्रियपंचक मना अधिन । तें मन वैराग्या आकळीलें जाण । इंद्रियें अनायासें करून । जिंकिलें जातें सर्वहि ॥६५॥ विषयध्यान सोडितां समस्त । मन होइल अधार - रहित तेव्हां पडुं पाहेन लया आंत । अथवा तूष्णिंभूत होइल पै ॥६६॥
तरि सोडोनि विक्षेपाचि फांदि । न पडतां लयाचिये संधि । तुष्णिं न राहातां शुत्धबुत्धि । आत्मस्वरुपिं योजावि ॥६७॥
जैसे हिमालय पर्वतामाझारि । बैसुनि जाति सिख्यावर्हि । अति धैर्य धरोनि अंतरिं । पैल तटातें पावती ॥६८॥
ते न पडती कड्या माझारि । न राहाति उगेचि मध्यंतरिं । इकडील झोका तिकडे सत्वरि । घेउनि जाती पैलीकडे ॥६९॥
तैसें दृश्यमात्रातें सोडून । साधकें करावें आत्मचिंतन । लय कषायातें सांडून । अनंत स्वरूप ब्रह्माचें ॥७०॥
ब्रह्म सहस्त्र कोटि योजनें । इतुकें उंचि रुंदि लंबायमान । ऐसि गणना नशेचि जाण । ह्मणोनि अनंत ह्मणीजे पै ॥७१॥
कोण्हि एक पामर जाति । अनंत स्वरुपाचें व्याख्यान करिति । किं ब्रह्म अहे कैशा स्थिति । हें न कळे ह्मणोनि अनंत तें ॥७२॥ तरि न करावें ऐसें व्याख्यान । न कळे तरि अनुभव होइल कोठुन । ब्रह्माचा अंत न लागला जाण । तरि काय उणें साधकाचें ॥७३॥
जैसें समुद्र - तटाकिचें जळ । कोण्हि येकानें पाहिले प्रांजळ । आणि न पाहिला पैलतीर केवळ । तरि का समुद्र न पाहिला ॥७४॥ तैसा विऋत्तिव्याप्ति करुन । आत्मा लक्षिला साधकानें । जरि फळ व्याप्तिवत हा इतुका म्हणून । न कळे तरि काय गेलें ॥७५॥ आसो त्या पामर जनाचा गोष्टि । नायके तुं कर्णसंपुटिं । स्वरुपिं योजिनि ज्ञानद्रिष्टि । अनंत स्वरुप चिंती पा ॥७६॥
तंव सिष्य ह्मणे वो श्रीगुरुराया । विनंति करितों लागोनि पाया । अनंत स्वरुप चिंतावया । बरेंचि कथिलें स्वामींनीं ॥७७॥
येथवरि जे उपाय कथिले । ते सर्व अनुभवासि आले । लय विक्षेपातेंहि वोलांडिलें । परि तुष्णिं ठेलें चित्त माझें ॥७८॥
जैसा माळियें पाण्याचा लोट । भूमि खणुन नेला सुभट । परि त्यातें न दाखवीतां क्षेत्रपीठ । ऐलिकडेचि सोडिला ॥७९॥
उदकें अपुल्या भरति करून । उलंघिले चडाव आणि लवण । परि पुढें मार्ग न सुचतां जाण । उदक फिरे माघारें ॥८०॥
तैसें तुह्मि सांगितलें त्या प्रमाणें । सुक्ष्म जालेंसे माजें मन । लय विक्षेपातें सांडुन । तुष्णिंभूत होतसे ॥८१॥
ते तूष्णिं क्षणेक राहातसे । सवेंचि मागति दृश्यावरि येतसे । याजप्रति करावें कैसें । स्वामिराया दयाळा ॥८२॥
तरि कांहीं तरि उपायातें । स्वामिनिं कथिलें पाहिजे मातें । जैसे शाखेवर्होनि चंद्रातें । दाखविति द्वितियेचा ॥८३॥
मग श्रीगुरु होवोनि प्रसन्न । बोलते जाले सिष्यालागुन । धन्यधन्य तुझें मुमुक्षुपण । पाहिलेंसे या काळीं ॥८४॥
सांडोनि लय - विक्षेप - कषाय । तेथोनिहिं पुढें पुससि उपाय । आता तुज उतराइ होउं काय । आत्मस्वरुपावांचुनि ॥८५॥
अगा कित्तेक तूष्णिं करोनि मन । येकांति बैसति डोळे झाकुन । ब्रह्मस्वरूप जालों म्हणुन कषायातें सेविंत ॥८६॥
असो तुझि शुत्ध बुत्धि पाहुन । प्रसन्न जालें माझें मन । तरि आतां शुत्ध आत्मचिंतन । दृष्टांतें करोनि सांगतों ॥८७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 21, 2016
TOP