मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ३२ व ३३

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अमनस्त्वान्न मे दु:खरागद्वेषभयादय: ।
अप्राणोह्यमना: शुद्ध इत्यादिश्रुतिशासनात् ॥३२॥

संकल्प विकल्पात्मक जें मन । तें मी सर्वथा नोव्हेचि जाण । मग दु:ख भय राग द्वेष संपूर्ण । मजला कैचे आसति ॥१६॥ आत्मा अप्राण अमन इत्यादिक श्रुति स्पष्टपणें देतसे हाक । जरा मरण मन प्राणादि समस्त । देहद्वयाचेचि आसति ॥१७॥
जन्म जराकर्षत्व मरण । हे स्थूळदेहाते आसति संपूर्ण तैसेची लिंग देहाप्रति जाण । मन प्राण इंद्रियें आसति ॥१८॥
संकल्प विकल्पात्मक मन । त्याचे राग द्वेष दु:ख आदि करुन । क्षुप्तिपासा प्राणाचें लक्षण । विषयभोग इंद्रियाचा ॥१९॥
देहद्वय मजहुनि अन्य आसति । तेव्हां उपाधि कांहींच मज नसति मी शुद्ध स्वरूप चिद्रभस्ति । निरोपाधिक असे पै ॥२०॥

निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजन: ।
निर्विकारो निराकारो नित्यमुक्तोस्मि निर्मल: ॥३३॥

मी निर्गुण निराकार । निष्क्रिय नित्य निर्विकार मज नसे माया अंजन प्रकार । म्हणोनिया मी निरंजन ॥२१॥
मी कल्पनातींत निर्विकल्प । वासना बंधरहित मुक्तरूप दृश्य जडरासि मळ विरूप । नसे म्हणोनि मी निर्मळ पै ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP