|
पु. १ सोंड असलेलें एक प्रचंड जनावर ; गज ; कुंजर ; वारण , २ नक्षत्रमालेंतील १३ वें नक्षत्र ; हस्त . म्ह० पडेल हत्ती तर पाडील भिंती . ३ ( जरतार ) तूर ज्यांत फिरते तो खांब . ४ बुद्धिबळांतील एक मोहरें . [ सं . हस्तिन् ; प्रा . हत्थि ] म्ह० १ हत्तीला अंकुश केवढा असतो१ ( मोठ्याला लहानहि भारी होतो ). २ हत्ती गेला व शेंपटाशी अडकला - एखादें प्रचंड काम अखेरपर्यंत सुरळीत होऊन शेवटी मात्र नासणें , ३ हत्ती चालतो आणि कुत्रे भोंकताच - श्रेष्ठांचा मत्सर करणारे लोक असतात पण त्यांचे कांही चालत नाहीं . ४ हत्तीबरोबर बैलाचें वारगोळें . ०दारात --- अत्यंत श्रीमंती असणें . ( वाप्र .) हत्तीचा अंकुश --- पु . ( ल .) चोपून काम करुन घेणारा . हत्तीचा पाय --- पु . १ ( ल .) ज्याच्या औदार्यानें , श्रीमंतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अह्सी व्यक्ति , काम , धंदा , निकरी , इस्टेट इ० . २ एक खेळ . झुलणें --- अत्यंत श्रीमंती असणें . ( वाप्र .) हत्तीचा अंकुश --- पु . ( ल .) चोपून काम करुन घेणारा . हत्तीचा पाय --- पु . १ ( ल .) ज्याच्या औदार्यानें , श्रीमंतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अह्सी व्यक्ति , काम , धंदा , निकरी , इस्टेट इ० . २ एक खेळ . ०दांत पुन . हत्तीचा दांत ; हस्तीदंत . ०दांती वि. हस्तनक्षत्राच्या पावसानें येणारें पीक . दुसरीं दोन पीकें - मृगबार , आंबेबार . ०भोग पु. एक प्रकारचा जाड तांदूळ . ०महाल पु. हत्तीखाना . ०सोंड पु. एक मुलांचा खेळ . हस्तीण स्त्री . हत्तीची मादी . हत्तीचें उथाण न . हस्तनक्षत्राच्या वेळचा अतिशय उकाडा . हत्तींच्या आहारांत लाखो मुंग्यांचा आहार चालणें थोरांच्या खर्चोत अनेक गरीबांचा आपोआप समावेश होणें . हत्तीच्या गंडस्थळीं बसणें थोर वैभवास चढणें . हत्तीच्या दांतासारखे दांत असणें दुटप्पी वर्तन असणें ( हत्तीचे खायचे दांत व दाखवावयाचे दांत निराळे असतात यावरुन ). हत्तीच्या पायांत - पावलांत - सगळ्यांचे पाय - पावलें मुख्य व्यक्तींत हाताखालील सर्व व्यक्तींचा समावेश आपोआप होतो . हत्तीशीं टक्कर , घेऊं नये बलिष्ठाशी वैर करुं नयें . हत्तीस ओंढाळ कोण म्हणेल ?--- थोरांचे बिंग बाहेर कोण फोडील ? हत्तीसारखें वतन अलोट संपत्ति ; वैभव . हत्ती होऊन लांकड खाणें , मुंगी होऊन साखर खाणें मोठे ( गर्विष्ट ) पणानें आपदा येतात तर नम्रतेनें सुख लाभतें . हत्तीचें मढें - प्रेत १ अवाढव्य , बोजड , न पेलणारें प्रकरण , कम . २ फार कंटाळवाणें , त्रासदायक काम . ( क्रि०पुरणें ; उचलणें ). मला हत्तीचें मढे पुरावयाचें आहे हत्तीच्या पायानें जाणें फार सावकाश जाणें ( रोग , इ० ) ०खाना पु. हत्ती ठेवण्याची जागा ; पीलखाना .
|