|
स्त्री. १ सरहद्द ; मर्यादा ; सीमा . २ ( ल . ) दिशा ; बाजू ; प्रदेश . यंदा दक्षिणेचे सरदेस पर्जन्य पडला नाहीं . राजापुरी पावेतों सरद दर्याकिनारा मोकळा केला . - सभासद ५२ . ३ ( ल . ) ताब्यांतील प्रदेश ; हद्दींतील प्रदेश ; मर्यादित प्रदेश . अशास त्याचे सरदेंत त्याचा कौल व तुमचे सरदेंत तुमचा कौल . - वाडशाछ १ . १०६ . ४ ( ल . ) रांग ; ओळ ( झाडें , टेंकडया , घरें वगैरेची ). [ फा . सरहद्द ] वि. १ थंड ; गार ; ओलसर ; आर्द्र ; दमट ; सर्द ; शीत ( हवा , जागा , बागा वगैरे ). २ शीतल ; थंडावा आणणारें ; ज्यापासून थंडी होईल असें ; दाहशामक ( औषध , खाद्य , पदार्थ ). [ सं . शरद् ; फा . सर्द ] सरद होणें , मनांत सरद होणें - एखाद्याबद्दल रुष्ट होणें ; नाखूष होणें ; खट्टू होणें ; खप्पा मर्जी होणें , थंड पडणें ; वरमणें . सरदणें - अक्रि . १ दमट , ओलसर , थंड होणें ; ओल येणें , ( जागा , वस्तु ). २ गारठणें ; थिजणें ; शरमणें . इंग्लिश सैन्य पार सरटून गेलें . - इंप १८३ . सरदावणें , सरदेणें - अक्रि . ( राजा . ) दमट , ओलसर होणें ; सर्द होणें . सरदगरमी - स्त्री . १ सरदीनें मिश्र उष्णता ; मध्यम उष्णता ; थंडाव्यानें कमी उग्र भासणारी उष्णता ( हवेंतील , पाण्यांतील वगैरे ). २ प्रकृतींतील थंड उष्ण असा होणारा फरक ; एक व्याधि . सरदभात - न . भाताची एक जात ; एक जातीची साळ . सर्द पहा . सरदी - स्त्री . १ थंडी ; ओलावा ; आर्द्रता ; दमटपण ; ओलसरपणा ; ओल . २ शैत्य ; थंडावा ; सर्दी ( प्रकृतींत थंडीचा प्रादुर्भाव , प्रकृति थंड असणें ). ३ थंडी ; शैत्य ; सर्दी ( प्रकृतींत शैत्याचा विशेष जोर होऊन ती नादुरुस्त होणें ).
|