Dictionaries | References

यावा

   
Script: Devanagari

यावा     

 पु. 
उदय ; प्राप्ति ; आगमन . मग म्हणे जी श्री गुरुदेवा । जो तुम्ही दाविला निज रुपाचा यावा । - स्वादि १२ . २ . १०३ .
प्रभाव ; धैर्य ; सामर्थ्य ; बल . समई यावा चुको नये । - दा २ . २ . ३१ .
ओघ ; प्रवाह . तंववरी नदानदींची नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जंव न येती आघवे । समुद्रामाजीं । - ज्ञा ९ . ४६२ .
आवेग ; आवेश ; फेरा ; संचार ; प्रवेश ; तडाखा ; कचका . कृष्णासी म्हणे राहे साहे । माझा यावा आला पाहें । - एरुस्व १२ . ८९ .
स्वारी . आला कर्नाटकी यावा । - राम दासी २ . १८७ .
महत्त्व ; सामर्थ्य ; श्रेष्ठता . मत्पुत्र इंद्रासम ज्यास यावा । - वामन विराट ८ . २९ . [ येणें ] यावांका - पु ( महानु . ) धैर्य ; पुरुषार्थ . ऋषीशृंगु तपाचा यावांका । - भाए ४६० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP