|
स्त्री. चौकोनी फडक्याचीं चार टोकें एकत्र धरून भिक्षेसाठीं बनविलेली झोळी ; मधुकरीचें फडकें ; भिकार्याची झोळी . अन्नत्रवाल्यास जसा चौपदरीचा योग यावा त्याप्रमाणें या भरतभूमिवासी जडभरताची आजला हालहवाल होऊन गेली आहे . - केसरी - वि . १ चार पदरांचा , पेडांचा ( दोर इ० ). २ चौघडी ; चार पदर होतील अशा रीतीनें घडी घातलेलें ( लुगडें , धोतर इ० ). [ चौ = चार + पदर = कोपरा , टोंक ] ( वाप्र . ) ०गळा मोठयानें रडणें , ओरडणें . काढणें मोठयानें रडणें , ओरडणें . ०हातीं , हातीं येणें - भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें ; भीक मागणें . अलीकडे तूं मुळींच अभ्यास करीत नाहींस , पुढें चौपदरी हातीं घेणार आहेस कीं काय ? घेणें , हातीं येणें - भिक्षा मागण्याचा धंदा आरंभिणें ; भीक मागणें . अलीकडे तूं मुळींच अभ्यास करीत नाहींस , पुढें चौपदरी हातीं घेणार आहेस कीं काय ? ०चा पु. ( उप . ) भिकारी . चौपदरीचा जहागिरदार , नी मिजास बादशहाची . जहागिरदार पु. ( उप . ) भिकारी . चौपदरीचा जहागिरदार , नी मिजास बादशहाची .
|