|
क्रि. १ नको , लागत नाही . आवश्यकता , प्रयोजन नाही या अर्थाने योजावयाचा शब्द याचे अनेकवचनांत नलगेत . प्रथमांत पदार्थ , आणि आयला , आयाला , आवयाला , आया , आवया , आवा या प्रत्ययांत धातुसाधितासह प्रयोग करितात . जसेः - मला साखर नलगे ; जेवावयाला ; जेवावया , जेवावे , जेवणे नलगे इ० कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा । - दा ३ . ३ . ११ . वादळामुळे गलबतावरील सर्व स्त्रिया घाबरुन गेल्या हे सांगणे नलगे . - कोरकि ७४ . सुज्ञासु ज्यास्त लिहिणे नलगे . २ सयुक्तिक , सुसंगत संभवनीय नाही अशा अर्तानेहि योजितात . तसा दिवस पुन्हां यावा नलगे . [ न = नाही + लागणे = जरुर , अवश्य असणे ]
|