Dictionaries | References

शेज

   
Script: Devanagari

शेज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
that they may sleep or lie together. This particular of the nuptial observances is Konkan̤í and elsewhere, but it is not universal. शेजेस येणें To lie down to sleep;--used esp. of a horse. 2 To granulate;--used of a healing wound or sore. शेज पडणें or लागणें g. of s. To be begun or entered upon;--as a work having distinct points to be attended to in order; to have the train or linecommenced.

शेज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A bed. The spot formed on the forehead with कुंकूं, (the daub of कुंकूं as a
bed for अक्षता on the forehead of people at weddings &c.)
 . भर, लाव.
n f  Train

शेज     

ना.  अंथरुण , बिछाना .

शेज     

स्त्रीन . १ रांग ; ओळ ; बाजू ; क्रम . धर्माशी नीतिशी । शेज धरी । - ज्ञा ४ . ५३ . २ मळवट ; विवाहादि मंगल प्रसंगी कपाळावर गंधाचा लेप करतात . ( अक्षता लावंण्याकरितां ) ती ; ( क्रि० भरणे , लावणे ). ३ शय्या ; अंथरूण ; बिछाना ; निजण्याकरितां तयार केलेली गादी वगैरे घालून मऊ जागा . डोळा नलगे शेजेसी । निद्रेमाजी देखे कृष्णासी । - एरुस्व ५ . ३० . ४ मोहरमांतील मखर . [ सं . शय्या ; प्रा . सेजा ; गु . शेज ; हि . पंसि . सेज ] ( वाप्र . ) शेज घेणे - ( चांभारी ) जोडयाचा कडेचा भाग छाटणे , व्यवस्थित करणे . शेज पडणें , शेज लागणें - रांगेस लागणें ; क्रमप्राप्त होणे ; सूरू होणे . शेजेस घालणें - नवरानवरीस एकत्र निजविणें . शेजेस येणे - १ लवंडणे ; झोपण्याकरितां बसणे ( घोडा ) . २ भरून येणे ; खपली धरणे ; माठळणे ( जखम ) शेजारती , शेजआरती - स्त्री . रात्री निजावयास जाण्यापूर्वी देवाची करावयाची आरती . शेजओटी - स्त्री . ब्राह्मणांमध्ये गर्भाधानप्रसंगी रात्रौ माहेरची माणसे ओटी भरतात ती . - बदलापूर २०७ शेजघर - न . शय्यागृह ; निजण्याची खोली , जागा . शेजार - न . १ शय्यागार ; निद्रागृह ; निजण्याची खोली , जागा . दुधाची शेजारें । क्षीराब्धी ऐसी मनोहरे । - ज्ञा ९ . ३९० . २ बिछाना ; शय्या . जाले आपुले शेजार । तेथे हृदयाच्या शेजारी । - विपु २ . ९४ . [ सं . शय्यागार ] शेजोटे - पु . १४ - २० माणसें बसूं शकतील असा चौरंग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP