Dictionaries | References

जुलूम

   
Script: Devanagari

जुलूम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

जुलूम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tyranny, oppression, injustice; unjust compulsion or constraint. 2 it is used freely whenever vehement action, strenuous effort, or excessive labor is to be expressed. Ex. आज पाव- सानें जु0 केला To-day it has poured in torrents; पोरानें रडण्याचा जु0 केला The child is bellowing with might and main; मोठे जुलमानें नदी डोंगरावरून नेली; म्यां औषध जुलमानें खाल्लें. 3 used also to express one's admiration or marveling emotion at witnessing any enormous magnitude or extravagant copiousness or plenty.

जुलूम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

जुलूम

जुलूम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

जुलूम

  पु. जबरदस्ती ; जबरी ; बलात्कार ; परपीडा ; अन्याय ; अन्यायाचा दाब ; प्रतिबंध . २ जोराचें कृत्य ; दीर्घ प्रयत्न ; अतिशय श्रम . एखाद्या गोष्टींत बेसुमारपणा या अर्थानें उपयोग होतो . अतिशयपणा ; जाजती ; कमाल . आज पावसानें जुलूम केला . पोरानें रडण्याचा जुलूम केला . ३ अतिशयवैपुल्य किंवा अवाढव्य आकारमान पाहून झालेली आश्चर्यचकित मनोवृत्ति दर्शविण्यासाठीं योजितात . [ अर . झुल्म ] ( समासांत किंवा सामान्य रूपांत जुलम असें रूप येतें ) सामाशब्द - जुलमाचा रामराम - पु . ( आपल्याशीं नीट न वागणार्‍या अधिकार्‍याला तो जुलूम करील या भीतीनें , केलेला रामराम ). निरुपायानें नाखुषीनें पत्करलेली गोष्ट ; सभ्यपणें पण कडक हुकूम करून केवळ करावयालाच पाहिजे नाहीं तर शिक्षा होईल अशा धाकामुळें केलेलें काम . सक्तीनें करून घेतलेलें काम , नोकरी इ० . आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलुमाचा रामराम पत्करला . - भा ९० . जुलमाजुलमीं , जुलमानें , जुलमाजुलमानें , जुलमावर - क्रिवि . १ जबरीनें ; बळजोरीनें . २ अतिशय श्रमानें , कष्टानें ; जीव तोडून ; होईल तितका प्रयत्न करून ; युक्तिप्रयुक्तीनें [ जुलूम द्वि . ] जुलमी - वि . जबरदस्ती करणारा ; कठोर ; प्रजापीडक ; अन्यायी . [ अर . झुल्मी ] जुलूमजबरी - स्त्री . बलात्कार ; जुलूम .
०दस्ती   जास्त जास्ती - स्त्री . १ जुलूम . - राजवाडे २२ . १२० . २ जुलमाचा , जबरदस्तीचा व्यवहार किंवा आचरण ; करडा अंमल ; सक्ती , जबरद्स्त उपाय . [ अर . झुल्म + फा . दस्त ; फा . जिआदती ]
०पादशाही  स्त्री. अतिशय जबरद्स्ती ; बलात्कार ; बळजबरी ; कडकपणा ; कार्यातिरेक ; अमर्याद कृत्य ( एखाद्या कृत्याचा बेसुमारपणा दर्शविण्यासाठीं योजतात ). [ अर . झुल्म + फा . पातशाही ]
०बाजार  पु. ठराविक दिवसाहून अन्य दिवशीं भरवावयास सांगितलेला बाजार .

जुलूम

   जुलूम जबदरस्‍ती
   जुलूम
   जच
   त्रास.
   जबरदस्‍तीचा व्यवहार
   करडा अंमल
   जलाली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP