Dictionaries | References

अरेराव

   
Script: Devanagari

अरेराव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A braggadocio, boaster, blusterer; a bully, a swingebuckler, a Hector.

अरेराव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A boaster, braggadocio, a bully.

अरेराव     

ना.  अहंमन्य , गर्विष्ट , तिस्मारखान , धटिंगण , बढाई मरणारा .

अरेराव     

 पु. अरे ! अरे ! करण्यांत पटाईत . फुशारकी मारणारा ; फुकट प्रतिष्ठितपणा दर्शविणारा ; खणक्या ; धटिंगण ; खलेल ; टेकोजी ; लोकांत मन मानेल तसें वागणारा ; रगडमल्ल ; अहंमन्य ; गर्विष्ठ ; अल्पाधिकारानें प्रमत्त झालेला ; तिस्मारखान . राष्ट्रीय सभा पूर्णपणें राष्ट्रीय हित साधणारी व्हावी , तिचें काम जनतेच्या बहुमतानें व जाहीर रीतीनें व्हावें , तें एखाद्या अरेरावाच्या खोलींत खासगी रीतीनें होऊं नये असें आमचें म्हणणें आहे . - टिव्या . [ अरे + राव ] - वी , वकी - स्त्री . जुलूम ; अहंमन्यता ; दडपशाही ; फुशारकी . विद्याखात्याचें धोरण अरेरावीचें असून - केले १ . ४९ . - वि . जुलमी ; अहंपणाचें ; आडदांडपणाचें ; उध्दट ; अन्यायी . चार्लस इलियट यांच्या सारख्या अरेरावी अंमलदारास खोल पाण्यांत शिरावयाचें होतें . - टि १ . १६२ .

अरेराव     

लोकांस सदा हुकमतींत ठेवणारा
जुलुमी.
अहंमन्य
गर्विष्ठ
मातलेला. ‘ राष्ट्रीयसभा पूर्णपणें राष्ट्रहित साधणारी व्हावी, तिचें काम जनतेच्या बहुमतानें जाहीररीतीनें व्हावें, तें एखाद्या अरेरावाच्या खोलींत खासगी रीतीनें होऊं नये असें आमचें म्हणणें आहे. ’ -टिव्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP