न. - आकाश ; अस्मान . म्ह० अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें .
- अभ्र ; ढग ; मेघपटल ; काळोखी ; ढगानें व्यापलेलें आकाश ; ढगाळपणा .
कडकडित अभाळें । येऊनि आकाश झांकोळे । - एभा ७ . ४४९ . गगनीं अभाळ आलें ।
मागुती सवेंचि उडालें । - दा २० . ७ . २६ .
- ( ल . ) संकट ; बंड . मोंगलांचें पारिपत्य झालें म्हणजे चार अभाळें
उठलीं आहेत हीं विरतील . [ सं . अभ्र + आलय ; प्रा . अब्भ ; गु .
आभ ; झें . अब्र ; फा . अब्र ].
०कोसळणें मोठें अरिष्ट येणें ; गुदरणें .
०खराळणें ( व . ) आकाशांत जोराचा गडगडाट होणें .
०डोक्यास लागणें, टेकणें, दोन वाटें उरणें, ठसठसां लागणें, ठेंगणें दिसणें, होणें अतिगर्विष्ठ माणसाबद्दल योजावयाचें प्रयोग .
०फाटणें = मोठें अरिष्ट गुदरणें ; सर्वंच बाजूंनीं संकटें येणें .
०येणें क्रि . संकट येणें .
ळाखालीं , तळीं पृथ्वीच्या पाठीवर ; मृत्युलोकीं ; पृथ्वीवर .
शीं भांडणें अती ऊंच होणें , असणें ; गगनचुंबित असणें - झाडें , इमारती वगैरे .
भयंकर भांडखोर असणें ; निष्कारण कलह करणें ; वार्याशीं भांडणें .
वर अ०येणें एकावर एक संकटें येणें , ओढवणें .
वर थुंकणें निष्फळ प्रयत्न करणें किंवा आपल्याच अंगावर बाजू ओढवेल असें कृत्य करणें .
-वर चढणें - वरचढपणानें अधिकाधिक मागणी करणें ; एकसारख्या मागण्या करीत राहणें .
- अरेराव होऊं लागणें ; आढ्यतेखोर बनणें .
स भोंक पडणें अति वृष्टीबद्दल योजावयाचा प्रयोग ; मुसळधार पाऊस पडणें . संततधार लागणें .
चा गंड पु . ( शेतकी )= अभ्रा ढगांची गर्दी .
चा गाळ पु . गर्द ढग ; मळभ ; ढगाची काळोखी .
ची सावली स्त्री . क्षणभंगुर गोष्ट ; पाण्यावरील बुडबुडा ; अभ्रछाया ; ढगाची सावली .