Dictionaries | References

घासणें

   
Script: Devanagari
See also:  घांसणें

घासणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Pr. घासून घ्यावें पण हासून घेऊं नये Suffer any thing, but incur not public ridicule.
To rub against. 2 fig. To contend against; to collide or clash with. 3 To haggle or chaffer; to stickle.

घासणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To rub, scrub, scour. To discuss, agitate in argument. To suffer (loss, injury &c.).
घांसून घ्यावें पण हांसून घेऊ नये   Suffer any things, but incur not public ridicule.
v i   To rub against. To contend against; to collide or clash with. To haggle or chaffer.

घासणें     

उ.क्रि.  १ घर्षण करणें ; चोळणें ; जोरानें पुसणें ; साफ करणें ; घासटणें . २ खरडणें ; झाजरणें ; ओरबडणें . ३ रागें भरणें ; कानउघाडणी करणें ; खरडपट्टी काढणें ; खडसणें . ४ वादविवाद , चर्चा , भवति न भवति , काथ्याकूट करणें . ५ ( एखाद्यास व्यवहारांत ) फसविणें ; बुडनिणें ; बुचाडणें . ६ ( ल . ) पुन : पुन : ( एखाद्या अभ्यासाची ) आवृत्ति करणें ; घोकणें ; पाठ करणें ; घट्ट करणें . हा श्लोक दहादां घासला म्हणजे पाठ होईल . ७ पढवून तयार करणें ; पढविण ; मेहनतीनें अभ्यास करविणें . हीं पोरें घासलीं पाहिजेत , तेव्हां दोन अक्षरें येतील . ८ ( ज्ञान इ० कांस ) उजळा देणें ; गंज घालविणें ; आवृत्ति करून ( ज्ञान इ० ) तयार ठेवणें . - अक्रि . १ घासलें जाणें . २ ( ल . ) ( एखाद्याशीं ) भांडणें ; झगडणें ; चकमक होणें ; खेटणें ; बरकशी लावणें ; स्पर्धा करणें . ३ घासाघीस करणें ; आग्रह ; अट , हट्ट धरणें ; ओढून धरणें . [ सं . घर्षण ; प्रा ; घासण ; हिं . घसना ; गु . घसवुं ; सिं . घशों ; फ्रें . खोस ] घासून घेणें - १ ( निराशेनें , संतापानें , निष्फळ झालेल्या मत्सरानें ) हात चोळणें , चुरमळणें ; चडफडणें . तूं आपल्या घरीं घासून घेतलेंस म्हणून त्याचा केंसही वांकडा होणार नाहीं . २ सोसणें ; सहन करणें ( नुकसान , दु : ख ). म्ह० घासून घ्यावें पण हांसून घेऊं नये = वेळ पडल्यास वाटेल ते नुकसान सोसावें पण लोक आपणास हंसतील , ठपका देतील असें करूं नये .

घासणें     

घासून घेणें
१. हात चोळणें
चरफडणें
दांतओठ खाणें. निराशेने, संतापाने आपल्‍यापाशीच जळफळणें. २. सोसणें, सहन करणें
नुकसान खाणें
दुःख साहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP